विशेष प्रतिनिधी नांदेड- येथील अक्षरोदय साहित्य मंडळ या संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा साहित्य गौरव पुरस्कार व शाहीर गौरव पुरस्कार अनुक्रमे सुप्रसिद्ध विद्रोही कवयित्री छाया बेले व ख्यातनाम शाहीर दिगू तुमवाड यांना निवड समितीने जाहीर केले आहेत. अक्षरोदय साहित्य मंडळाच्या कार्यालयात दि. 5 जानेवारी 2025 रोजी एक बैठक होऊन हे पुरस्कार जाहीर करण्यात आले ओहत. 12 जानेवारी 2025 ला होणार्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मारोती मुंडे हे होते तर यावेळी सहसचिव चंद्रकांत चव्हाण, कोषाध्यक्षा उषाताई ठाकूर, कार्याध्यक्ष सदानंद सपकाळे, कार्यवाह बालिका बरगळ, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती.
अक्षरोदय साहित्य मंडळाच्या पुरस्कार निवड समितीने दिपक सपकाळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार यावर्षी विद्रोही कवयित्री छाया बेले यांना जाहीर झाला आहे. तर स्मृतीशेष ज्येष्ठ शाहिर विठ्ठलराव जोंधळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा शाहीर गौरव पुरस्कार हा शाहीर दिगू तुमवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार हा मागील दोन वर्षापासून देण्यात येत आहे. साहित्यिक छाया बेले व शाहीर दिगू तुमवाड यांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Comments
Post a Comment