किनवट,ता.२०(बातमीदार): बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ता.१४ते २८ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने उद्या (ता.२१) कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी दिली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के, बेंबरेकर हे राहतील.कवी संमेलनात प्रसिध्द कवी व नाट्यलेखक नंदन नागरे, प्रसिध्द कवी व समिक्षक प्रा.डाॅ. प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे, राजेश पाटील, रमेश मुनेश्वर, महेंद्र नरवाडे,प्रा.गजानन सोनोने,हे कवी सहभागी होतील सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वृंद वर्ग उपस्थित राहावे अशी सुचना प्राचार्य, डॉ.एस.के.बेंबरेकर बळीराम पाटील. महाविद्यालय,किनवट यांंनी केली आहे
Comments
Post a Comment