पत्रकारांच्या सहकार्यामुळे जनसेवा करण्याचे बळ मिळते सौ. बेबीताई नाईक किनवट तालुका पत्रकार संघटनेची दहेलीतांडा येथे सांत्वनपर भेट
किनवट प्रतिनिधी:-
किनवट विधानसभेचे लाडके माजी आमदार लोकनेते दिवंगत प्रदीप नाईक यांच्या दुःखद निधनाबद्दल किनवट तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी दि 28 जानेवारी रोजी दहेलीतांडा येथे जाऊन नाईक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. जनतेप्रमाणेच पत्रकारांचेही अतोनात प्रेम आणि सहकार्य प्रदीप नाईक यांना लाभले आहे.यापुढेही पत्रकार बांधवांचे असेच सहकार्य लाभावे अशा अपेक्षा बेबीताई प्रदीप नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.
जलक्रांतीचे प्रणेते किनवट माहूर विधानसभेचे लाडके माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचे 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर दहेलीतांडा येथे भेट देत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सांत्वन पर भेटी दिल्या दरम्यान 28 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार सदस्यांनी दहिली तांडा येथे जाऊन नाही कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी प्रदीप नाईक यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई प्रदीप, भाचा अँड राहुल नाईक, बबलू नाईक, अनुषा डॉ. सुप्रिया कपिल नाईक,मोहनीश नाईक यांची पत्रकारांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करून धीर दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना बेबीताई नाईक अत्यंत भावुक झाल्या.प्रदीप नाईक आणि पत्रकारांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला एक सर्वसमावेशक नेता म्हणून माझ्या पतीला पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केले पत्रकारांच्या सकारात्मक बातम्यामुळे आम्हाला जनसेवा करण्याचे बळ मिळाले. पत्रकारांचे हे प्रेम आणि सहकार्य आमच्या कायम स्मरणात राहील. नाईक साहेब गेले म्हणुन आम्हाला परकं करू नका हा जिव्हाळा, प्रेम असच कायम असुद्या अशा भावना बेबीताई नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, धनलाल पवार, अरुण राठोड, उमेश राठोड, के. मूर्ती, अँड.मिलीद.सरपे,प्रमोद पोहरकर, फुलाजी गरड पाटील, गोकुळ भवरे, दुर्गादास राठोड ,अनिल भंडारे,किरण ठाकरे, मलिक चव्हाण, वसंत राठोड उपस्थित होते.
नेता निवडी बैठकी संदर्भात:
--------------------------------
पक्षाची पुढील राजकीय दिशा व नेतृत्वाबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता येत्या 31 जानेवारी रोजी एन के गार्डन येथे सकाळी 11 वाजता पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वाशी चर्चा करून नेता निवड केली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
Comments
Post a Comment