किनवट (तालुका प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन किनवट येथे दिनांक 22 /1 /2025 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेला पोलीस निरीक्षक ओम बिर्ला साहेब, अँड विलास सूर्यवंशी अँड एस. एम सरपे व किनवट तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते.. या कार्यक्रमांमध्ये भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष पुरावा कायदा व भारतीय साक्ष अधिनियम या प्रमुख कायद्याच्या बदलाची उद्देश व त्याची अंमलबजावणी या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये अँड सूर्यवंशी यांनी या तिन्ही कायद्या चा फरक सांगितला व सध्याच्या किनवट मध्ये होणारे सायबर क्राईम कमी करन्या साठी या तिन्ही कायद्याची उपयुक्तता सांगितली झालेल्या तीन कायद्यामधील शब्दाच्या सहजते मध्ये बदल व सुलभते बदल आपल्या अद्वितीय शैलीमध्ये श्रोत्यांना सांगून श्रोत्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून श्रोत्याने सध्याच्या किनवट पेक्षा शांततापूर्ण किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे असे आवाहन केले..पोलीस पाटलानी आपले कार्यालयीन अभिलेखे तयार करावे त्यामुळे शांतता निर्माण होण्यास मदत होते
किनवट तालुक्यात शांतता निर्माण करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांचीच..
असे सांगितले..
सदर कार्यशाळे चे नियोजन पो. हे. का.सुभाष दोनकलवार व पो. हे. का बोधमवाड यांनी उत्कृष्ट रित्या केले तसेच किनवट तालुक्यातील अनेक तंटामुक्ती आदेक्ष सामाजिक कार्यकर्ते
आदी उपस्थित होते...
Comments
Post a Comment