किनवट तालुका प्रतिनिधी-
मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावे.मराठी भाषेतील विसरत चाललेल्या बोलीचे संवर्धन व्हावे असे मत बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी व्यक्त केले.प्रारंभी थोर समाजसुधारक दिवंगत बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर ,प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी, डॉ.आनंद भालेराव, डॉ. शुभांगी दिवे,मराठी विभागप्रमुख डॉ.पंजाब शेरे उपस्थित होते .प्रास्ताविक डॉ.पंजाब शेरे यांनी केले.
पुढे बोलतांना कुलकर्णी सर म्हणाले,आपली भाषा ही मातृत्व प्राप्त झालेली भाषा आहे.आपण आज मराठी भाषेतील शब्द विसरत चाललो आहे .आपल्या परिसरातील संस्कृती व लोकजीवनाचा अभ्यास करून लेखन करावे.नियमित वाचन करावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अत्यंत संवेदनशील व वास्तव परिस्थितीचे चित्रण आपण करावे.बोली भाषेतून नवं निर्मिती करावे.भाषेचे संवर्धन करावे असे मत व्यक्त करून पहाडी आवाजात पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय समारोप डॉ.आनंद भालेराव यांनी केले तर
कार्यक्रमाचे आभार व सुत्रसंचालन प्रा प्रल्हाद जाधव यांनी केले.
याप्रसंगी प्रा.ममता जोनपेलीवार, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड,
डॉ.सुलोचना जाधव, डॉ स्वाती कुरमे,प्रा आम्रपाली हटकर,डॉ.रंचना हिपळगावकर,प्रा योगेश्वरी मुंढे,प्रा.नागनाथ मुकाडे प्रा.सतीश मिराशे,प्रा.तिडके, सुधीर पाटील व बहुतांश विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment