किनवट:
बँक फायनान्स आणि इन्शुरन्स कोर्स माहितीवर आधारित व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर , उप प्राचार्य डॉ.पंजाब शेरे प्रमुख पाहुणे सारंग खाकरे, प्रज्ञा भंडारे विचारमंचावर उपस्थित होते.
प्रारंभी थोर समाजसुधारक
स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सारंग खाकरे यांनी 'सीपीबीएफएल स्किल डेव्हलपमेंट कोर्स'ची माहिती दिली. पदवी शिक्षण घेत असताना हे कोर्स केले तर नौकरीमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते.या स्पर्धेच्या युगात आभासी पध्दतीने आपण प्रमाणपत्र कोर्स करून स्वावलंबी बनावे असे मत व्यक्त केले.या कोर्स संदर्भात आभासी पध्दतीने गांवडे साहेब यांनी सविस्तर माहिती दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस. एल. दिवे यांनी यांनी केले.
अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ पंजाब शेरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख प्रा आम्रपाली हटकर यांनी केले, तर आभार प्रा. सुनील तिडके यांनी मानले.याप्रसंगी प्रा.नागनाथ मुकाडे, प्रा.आनिकेत पहुरकर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment