(किनवट प्रतिनिधी)-
किनवट शहराअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी सुरू केलेले देशी दारूचे दुकान त्वरीत हे तरत्र हलवून अनुज्ञप्तीधारक नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार याचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
किनवट शहाअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार बाद या व्यक्तीचे काहि दिवसापूर्वी देशी दारू विक्रिचे दुकान सुरू केले आहे. अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासुन या देशी दारू दुकानाचे अंतर केवळ २० फूट आहे तर याच ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व हु. गोडराजे मैदान आहे या ठिकाणी दिवसभर नागरिकासह
वाहनांची वरदल असते तर गोंडराजे मैदान व अण्णाभाऊ साठे पुतळा असल्याने विविध राजकिय व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर क्षेत्र हे संवेदनशिल असतांनाही नितीन कन्नलवार या व्यक्तीचे मुख्य रस्तालगत देशी दारूचे दुकान सुरू केले आहे. या दुकानामुळे दिवसभर मद्यपी वावरत असल्याने अण्णाभाऊ साठे पुतळ्याची विटंबना
होण्याचा धोका निर्माण होत असून गोंडराने सभा मैदानात असल्यास मद्यपिकडून कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची भिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण मुख्य बाजारपेठेचे असल्याने बाजाराच्या दिवशी महिला व नागरिकांची वर्दर असते गदर्दीच्या वेळी मद्यपीकडून महिला वर्गाची छेडछाड होण्याची शक्यता आहे. या देशी दारू दुकानाला नागरिकांनी
विरोध करून सुध्दा अनुज्ञ जातीधारक राजु ऊर्फ बालू मुरगुलवार व बळीराम गुलवार यांनी नगरपालिका प्रशासन व राज्य उत्पादनशुल्क कार्यालयातील अधिका- यांना हाताशी धरू संवेदनशील क्षेत्रात देशीदारू विक्री परवाना मंजूर करून घेतला. या देशीदारूच्या दुकानामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हे इतरत्र हलवावे अशी या भागातील नागरिकांची मागणी असुन या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नांदेड व राज्य उत्पादन शुल्क कार्यकारी किनवत. व आदी कार्यालयाला देण्यात आले. असे निवेदनकरते सुगत गौतम नगराळे यानी सागितले.
Comments
Post a Comment