किनवट,ता.२९(बातमीदार): मराठी भाषा ही मातृत्वाची भाषा आहे.मराठी भाषेतील शब्द हे आम्हाला जगण्याचे बळ देतात.बोली भाषेतून साहित्य निर्माण व्हावे. रोजच्या व्यवहारात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करावे,असे आवाहन उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले.
किनवट न्यायालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी न्यायाधीश श्री.माने हे होते,तर प्रमुख पाहूणे म्हणून न्यायाधीश श्री.मेंढे व वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.पंजाब शेरे म्हणाले की, मराठी भाषेतील लुप्त होत चाललेली बोलीचे संवर्धन व्हावे.मराठी साहित्याचे वाचन करावे. साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. साहित्य वाचनाने माणूस प्रगल्भ विचार करतो . आपल्या परिसरातील बोलीचे संवर्धन करावे.
ॲड.डॉ.सागर शिलेवार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन ॲड.
सम्राट सरपे यांनी केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांच्यासह वकील व पक्षकारांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment