Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेला विकास ड्राफ्ट प्रसिद्ध करावा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मागणी

  किनवट शहर बातमीदार:- किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेल्या विकास योजनेचेचा ड्राफ्ट हा शहरातील नागरीकांकरिता अवलोक, सुचना, हरकती करिता प्रसिध्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना सादर केले आहे. किनवट शहराचा विकास योजनेचा ड्राफ्ट हा संचालक नगर रचना नदिड यांनी दिनांक ११ रोजी किनवट नगर परिषदेला पाठवले आहे. परंतु प्राप्त झालेला ड्राफ्ट अद्यापही किनवट शहरातील स्टेक होल्डरच्या अवलोकनार्थ तथा सुचना व हरकती करिता प्रसिध्द करणे आवश्यक असतो तसा नियम हि आहे. परंतु नियमांच्या पायमल्ली करिता प्रचलित असलेल्या किनवट नगर परिषदे करिता हि बाब नित्याचीच झालेली आहे. त्यामुळे कोणतेहि काम नियमांने होत नाही. येथिल लोकप्रतिनिधींचे नियंत्रण कर्मचा-यावर मोठा गाजावाजा करुन निवडणुक लढवून आलेले लोकप्रतिनिधी हे गेल्या पाच वर्षात निष्क्रिय ठरले असुन त्यांचा कोणत्याही प्रकारचा नियंत्रण नसल्याने अशा प्रकारे शहरातील नागरीकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे असा आरोप यावेळी कॉंग्रेस पक्षाकडुन करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे

रेल्वेची अर्धवट राहिलेली कामे गतिमान करा-खासदार हेमंत पाटील

  नांदेड, ता. २९: नांदेड दक्षिण खासदार हेमंत पाटील यांच्या हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. करावी. पनवेल नांदेड पनवेल साप्ताहीक रेल्वे गाड्या पुन्हा नव्याने रेल्वे गाडीचा विस्तार किनवट - सुरु कराव्यात. विशेष म्हणजे रेल्वे आदिलाबाद, किनवट औरंगाबाद रुंदीकरणामुळे अनेक लहान मोठ्या मध्य रेल्वे विभागाने विकासाच्या तुकाई निवासस्थानी गुरुवारी (ता. २७) आदिलाबादहून विदर्भातून मांजरी रेल्वे पॅसेंजर गाडी सुरु करावी, किनवट गावाच्या मार्गात अंडर ब्रिज तयार करण्यात यावा दृष्टीने रेल्वे रुंदीकरण, अंडर ब्रिज, अतिशय संथ गतीने कामे होत आहे त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे हे लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने  हे विकासकामे तात्काळ सुरु करावीत असे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हा १६५ किलो मीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर भोकर हिमायतनगर किनवट नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत  रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत शेतकऱ्यांना मोबदला देणे अशी होते. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. नांदेड येथुन म

सारंग वाकोडीकर यांचा खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने गौरव

    किनवट : येथील सेट ट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर , यांचा "महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022" तसेच 'महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा' दरम्यान मुंबई येथे  पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात  मा. राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचा गौरव केला आहे.           महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित "महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022" तसेच 'महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा' राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे दि.१६.१०.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता  पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात त  मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सुप्रसिद्ध वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत  आपणास सन्मानीत करण्यात आले होते.              हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारंग वाकोडीकर या धडपडणाऱ्या युवकां

कॉस्मापॉलिटन विद्यालयामुळे विद्यार्थ्यांना मिळाली सुर्यग्रहण पाहण्याची संधी.

  किनवट:(तालूका प्रतिनिधी)           कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवटमुळे सुर्यग्रहण पाहण्याची संधी येथील विद्यार्थ्यी, पालक व  नागरिकांना मिळाली.  शाळेतील सहशिक्षक बाळकृष्ण कदम यांनी दि. 25  रोजी सांय 5 च्या नंतर सूर्यग्रहणाचे निरीक्षण करून  खंडग्रास सूर्यग्रहणा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरचा वापर करण्यात आला.          किनवट शहरातील कॉस्मापॉलिटन विद्यालयाने प्रथमतः संगणक प्रयोग शाळेतून प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण कशा पद्धतीने घडते या विषयी चित्रफित दाखवून माहिती दिली. यामुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांना वैज्ञानिक माहीती मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते.  कॉस्मापॉलिटन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खगोलीय घटनेचा अभ्यास व्हावा यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरची व्यवस्था केलेली होती. ग्रहण पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी सुट्टी असतांना सुद्धा शाळेत उपस्थित होते हे विशेष. तर परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 4 वाजून 58 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरवात झाली. जस-जसा वेळ पुढे सरकत होता तस-तशी

दिवाळी सणा निमित्त मिता नानवटकर यांची रचना वाचुया

  शीर्षक-दिन दिन दिवाळी स्वयंप्रकाशी  दिवे   दारात काळोखाचा न अंश जिथे कृतज्ञ संवेदनांनी सुसज्ज पणत्यांची ही आरास इथे परंपरागत  वाटेवरती  त्या नकोय  दिशाहीन  चालणे  गरज, कारण  न  जाणता केवळ अनुकरण   करणे वैज्ञानिक कार्यकारणभाव नि स्नेहसंबंधाचा घेत ठाव उजळवायला  हवे खरंतर सुंदर  हृदयाचे  सुंदर  गाव दिवा  अंतरीचा हा पेटवून विचार  व्हावेत  प्रकाशित समाजोपयोगी     कर्मांनी मानवजात दिसावी हर्षीत सुवासिक    पानाफुलांची अन्  औषधी  वनस्पतींची मनोवेधक ठरावी रांगोळी हसऱ्या, प्रसन्न  निसर्गाची प्रत्येकाच्या मुखी भरवावा प्रेमळ   संवादाचा   प्रसाद गोड, सुमधुर  आठवणींचे ओठी   उमटावे   पडसाद बेमालूमपणेच     फुटावेत आत्म  समाधनाचे फटाके जागोजागून  ऐकू   यावेत सामुहिक हास्याचे धमाके अंगोपांगी  शोभून दिसावे सद्गुणांचे   नित्य  परिधान लक्ष  नात्यांच्या  नक्षत्रांनी उजळावे हर  घर  आंगण मीता अशोक नानवटकर 9823219083. सावनेर,नागपूर.

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते कोठारी पुलाचा शुभारंभ

किनवट प्रतिनिधी:-  किनवट माहूर तालुक्याच्या विकासाबाबत मी नेहमीच जबाबदारीने काम केले आहे. या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने येथील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो. कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणिवेतूनच कोठारी पुलासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळून दिला. नव्या पुलामुळे  या भागातील शालेय विद्यार्थी,शेतकरी व नागरिकांना मी जीवघेण्या प्रवासातून कायमस्वरूपी मुक्त केले याचा आत्मिक समाधान लाभत आहे असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. जवळपास तीन दशकापासून प्रलंबित असलेल्या किनवट ते शनिवारपेठ मार्गावरील कोठारी पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी कोठारी येथे  संपन्न झाला त्यावेळी आ भीमराव   केराम अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते व्यासपीठावर कॉ गंगारेडी बेनमवार, कोठारीचे सरपंच गेडाम, बोधडी खुर्दचे उपसरपंच डॉ नामदेव कराड, अनुसूचित जनजाती आयोगाचे गोवर्धन मुंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी आ भीमराव केराम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व कुदळ मारून पूल बांधकामाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आलायाप्रसंगी पुढे बोलताना आ क

किनवट येथे सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसले( भा. प्र. से.) यांची नियुक्ती

  किनवट प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाने किनवट येथे सहाय्यक जिल्हधिकारी म्हणुन श्रीमती नेहा भोसले यांची नियुक्ती केली आहे लाल बहादुर शास्त्री अकादमी मसुरी येथील फेज-२ चे प्रशिक्षण संपवुन राज्य शासनाकडे रुजु झाल्या नंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि. नांदेड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उप विभाग, जि. नांदेड या रिक्त पदावर नियुक्ती केली आहे. अशा आशायाचे पत्र अ.शा.प.क्र. एईओ-११२२/५/२०२२/ नितीन गद्रे (अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी दिले आहे किनवट येथे प्रथमच महिला सहायक जिल्हाधिकारी रुजु होत असल्याने किनवटकरांना आनंद होत आहे किनवट येथे आता पर्यंत अनेक चांगले सहायक जिल्हाधिकारी लाभले आहे हा इतिहास आहे आता मा. भोसले किनवट या आदीवासी तालुक्याचा चेहरा बदलतील अशी आश आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या करमाळा तालुक्याची आढावा बैठक संपन्न

 करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा तालुका शाखेची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.  यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी प्रतिपादन केले. या बैठकीत वर्षभरात घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. भविष्यात संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार करण्यात आला. संघाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने करुन सोलापूर जिल्हात नावलौकिक करु असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ आशाताई चांदणे यांनी आढावा बैठकीत सांगितले.  याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा सचिव  प्रमिला जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे,जेऊर शहर अध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, तालुका सचिव प्रदिप पवार, तालुका सचिव ज्योती माने, सदस्य सौ. माधुरी कुंभार, संभाजी शिंदे, सचिन नवल

प्रधानमंत्री यांच्या कौशल विकास भारत 'एक स्थानक एक उत्पादन' योजने अंतर्गत आदीवासी युवक- युवतीसाठी स्वंयरोजगार

  किनवट बातमीदार:- ता.१५  एक स्थानक एक उत्पादक , कौशल विकास भारत अभियाना अंतर्गत किनवट रेल्वे स्थानकावर 'एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट ' व गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास संस्था किनवटच्या सहकार्याने मौजे मरकागुडा येथील  आदिवासी युवक- युवतींना बचत गटांनी हातांनी तयार केलेल्या बांबुच्या शोभेच्या वस्तूचे किनवट रेल्वे स्थानक येथे मौजे मरकागुडा येथील आदीवासी युवक युवतींनी  स्टॉल उभारले  यावेळी या स्टॉलचे उद्घाटन करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मा.रुपेश जी दलाल व मा.स्टेशन मास्टर , मा.डॉ. सुनील व्यवहारे गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा मा. संगिता पाटील, मा.आत्मानंद सत्यवंश सर, उमेदचे पं स. चे समन्वयक मा. आडे सर मरका गुडाचे सरपंच रमेश मडावी आदींची प्रमुख उपस्थिती होती या द्वारे युवक प्रेरीत होवून स्वावलंबी बनतील अशे विचार या वेळी एम.जी. बी.शाखेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी मांडले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलिसांचा सन्मान

  पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलिसांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नवरात्रीचे औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस व वाहतूक क्षेत्रातील महिला रस्त्यावर रक्षणासाठी उतरतात आणि अडी अडचणीवर मात करत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व बजावत असतात. यासाठी वेळेचे बंधन न पाळता जनतेच्या संरक्षणाची जोखीम सांभाळताना घर, शिवाय जनता यांच्यामधील कसरत, समतोल सांभाळत आपले योगदान देतात. त्यांच्या या कामाचे श्रेय त्यांना मिळावे, त्यांचा गौरव व्हावा, त्यांना सन्मान मिळावा या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पोलीस तसेच वाहतूक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, शहराध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे, शहनाज कुरणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शाखेच्या पदाधिकाऱ्यानी हा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतल

शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबली पाहिजे--संभाजी ब्रिगेड

  किनवट प्रतिनिधी:- किनवट : राज्यातील ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही त्वरित थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.                                                                                                       कोविड १९ संसर्गजन्य आजाराचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी घातलेली पदभरती बंदीबाबतचे पत्र मा.आयुक्त (शिक्षण) आणि मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना निर्गमित केले आहे. सदर पत्रातील मुद्दा क्र.४ नुसार ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.     महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडले होते. व छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून RTE अ‍ॅक्ट 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्

दिवाळी सणानिमित्त विविध योजनेंतर्गतच्या शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस ऑक्टोबर महिन्यात वितरित होईल याची दक्षता घ्या ; तहसीलदार डॉ मृणाल जाधव

  किनवट,दि.१२(    अॅड. मिलींद जी सर्पे     ) : तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त  प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो  चणादाळ, १ किलो साखर,  १ लिटर पामतेल असलेल्या शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्याचा व कंत्राटदारांमार्फत शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामापर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सर्व शिधाजिन्नस संच हे दिवाळी सणानिमित्त देय असल्याने माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये  (दिवाळी सणापूर्वी) ईपॉस मशीनद्वारे वितरीत होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आज(ता.१२) तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रास्त भाव दुकानदारांच्या बैठकीत दिले आहेत.      कोणतेही संच सुटे करुन गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारास व दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वितरीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी.  सदर (१ किलो रवा,१ किलो साखर, १ किलो चणादाळ, १ लिटर पामतेल) संच प्रति रुपये १०० या दराने विक्री करावयाचे आहेत.  शिधाजिन्नस संच वितरीत करण्याकरीता  शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार प्राप्त क्विंटल १५० रुपये प्र

माहुर येथील पत्रकारावर झालेल्या गुन्ह्याची योग्य चौकशी करुन न्याय द्यावा - प्रेस सं. व पत्रकार सेवा संघाचे मा. तहसिलदार किनवट यांना निवेदन

  किनवट :- दैनिक पुन्यनगरीचे माहुर प्रतिनीधी सरफराज दोसाणी यानी दि.३०/०९/ २०२२ रोजी माहुरचे ग्रामिण रुग्णालय सलाईनवर तर दि.०३/१०/२०२२ रोजी माहुरच्या रुग्णालयात आरोग्य सेवेची ऐशी तैशी' या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केली होता. या बातमीचा राग अनावर धरून माहुर रुग्णालयात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेले डॉ. निरंजन केशवे यांनी दि.०८/१०/२०२२ रोजी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यान पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे पत्रकार सरफराज दोसाणी यांचे म्हणने आहे. असे असल्यास सदरचा प्रकार हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खिळखिळा करणारा असून लोकशाही हितार्थ बातमी करणा-या माध्यमाच्या प्रतिनीधीची मुस्कटदाबी करणारा आहे. करीता या प्रकरणात योग्य चौकशी करून योग्य तो न्याय दयावा या आशयाचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व मराठी पत्रकार परीषद वतीने मा. तहसीलदार किनवट यांना देण्यात आले. या निवेदनावर मराठी पत्रकार परीषदेचे अॅड. मिलींद सर्पे, मलीक चव्हाण, कामराज माडपेलीवार व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, आशिष शेळके, राजेश पाटील, सय्यद नदीम, विशा

उत्तम व्यवसाईक, समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये आवगत करणे गरजेचे ; एड. मिलिंद सर्पे

  किनवट,९ : व्यवसाईक व समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये अवगत करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन पत्रकार अॅड. मिलिंद सर्पे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात, शनिवारी(दि.८) संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळा पार पडली.यावेळी ते बोलत होते.    अध्यक्षीय समारोह प्रसंगी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले म्हणाले की, अँड. सर्पे यांनी समाजकार्य कौशल्ये प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन केंद्रातील सर्व समाजकार्य प्रशिक्षणार्थीना बातमी लिहीण्याचे  कौशल्ये शिकविले आहे,ते केंद्राचे विद्यार्थी आत्मसात करतील.  सुरुवातीला समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत इंगोले यांचा सत्कार समाजकार्य प्रशिक्षणार्थी शेख अर्षद यांनी केले. प्रमुख साधन व्यक्ती अँड. मिलींद सर्पे यांचा सत्कार संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंग

किनवट येथे उपोसथ दिन व अश्वीन पौर्णिमा साजरी

  किनवट: बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ  वाचनाची सांगता आज झाली सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुध्द विहार येथे अश्वीन पौर्णिमा ,उपोसथ दिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला व भोजनदान , खीर देण्याात आले यावेळी ग्रंथ वाचन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला काजल भवरे यांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचन केले तर सुत्रसंचालन क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी केले या प्रसंगी बौध्दाचार्य रामजी कांबळे, शिलवंत येरेकार, रमेश भवरे, मनोहर पाटील , रतन धर्मा, राजेश पाटील, राहुल भरणे, व विशाखा महिला मंडळाच्या सारजाबाई कावळे , रंजना सर्पे, कांताताई सर्पे, सुधाबाई परेकार, विठाबाई कावळे, राहीबाई पाटील, सोमीत्राबाई कावळे, विजयमाला आळणे, चांगोनाबाई कावळे, सुशिलाबाई ठमके, जयमाला आळणे, सिंधुबाई कांबळे, सारजाबाई कावळे,लक्ष्मीबाई पाटील, दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, पुनम रतन धर्मा,वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, सुजाता भरणे, सविता भरणे, नम्रता पाटील , काजल भवरे, ज्योती कावळे ,पुनम कावळे, पल्लवी कावळे, अनुश्री आळणे,पुजा सर्पे, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, माया धुपे, समता कयापाक, शितल कयापाक

बेलखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे थाटात उद्घाटन संपन्न.

दि.5सप्टे.2022रोजी बेलखेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मा.तारुसिंह बयास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.त्यानंतर  त्रिशरण पंचशील ग्रहण करून  प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत धुमाळेग्रा.प.सदस्य,एन. डी.पाटील कवी सुमेध घुगरे नरेंद्र पाटील लाभले होते,तर प्रमुख उपस्थितीत मा. नामदेव शिंगणकर (माजी संचालक कृ. उ.बाजार समिती उमरखेड,उत्तम पुंजाजी शिंगणकर, डी. बी. शिंगणकर (पत्रकार) गणेश शिंगणकर, भागोजी शिंगणकर, वैभव शिंगणकर,गजानन बी. शिंगणकर,दत्ता सयाजी शिंगणकर,विशाल भि. शिंगणकर, अमोल शिंगणकर, बी. जी. शिंगणकर तथागत यंग यूनियन मित्र मंडळ,सर्व बौद्ध उपासक उपासिका महिला मंडळ यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे  मा.नरेंद्र पाटील आणि लक्ष्मीकांत धुमाळे यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अर्हंत सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहार बांधकाम समितीचे अध्यक्ष कवी सुभाष शिंगणकर यांनी केले.सूत्रसंचालन अविनाश शिंगणकर यांनी केले आभार डी. बी. शिंगणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतली.

स्वारातिम विद्यापिठात आस्वाद आणि आकलन" या समीक्षाग्रह ग्रंथाचे प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते प्रकाशन

  किनवट - येथील प्रा. डॉ. राजू मोतेराव यांच्या "कादंबरी : आस्वाद आणि आकलन" या समीक्षाग्रह ग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, ललित कला विभागाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ.पी. विठ्ठल, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम सर , डॉ. पंकज सक्सेना यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.  याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव नेम्मानीवार , प्राचार्य डॉ.आनंद भंडारे, प्राचार्य कृष्णकुमार नेम्मानीवार,  प्राचार्या अनुजा पाटील, प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, ऍड. जी.एस.रायबोळे,डॉ. हेमंत सोनकांबळे, डॉ. पंजाब शेरे, डॉ. श्रीनिवास रेड्डी येनगुवार, प्रा. रमेश शिंदे, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. वायाळ, डॉ. थोरात, प्रा. माधव नेम्मानीवार,प्रा. अजय किटे,सागर नेमानीवार,  कामराज जाधव,रमेश सुरेशवार, सुरेश सावंगेकर, जगदिश रेड्डी नलमेलवार, विजय जाधव, मिलिंद एंगडे, सुधाकर पवार, निलेश चहांदे, सागर पाटील, अजय सावळे याबरोबरच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या किनवट तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न किनवट व माहूर तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

  किनवट, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, मराठवाडा युवा अध्यक्ष मारोतराव झम्पलवाड, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे, भोकर तालुका उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड, पत्रकार सुभाष नाईक, भोकरचे  अनिल डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव नसीर तगाले यांनी केले.  याप्रसंगी अनेक पत्रकारांनी तीन वर्षाच्या कार्यकाळात संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने आपल्याला कशा पद्धतीने मदत केली. याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संघाच्या किनवट तालुका युवा अध्यक्षपदी पत्रकार प्रणय कोवे, माहूर तालुका युवा अध्यक्षपदी शेख राजिक (वाई) तर माहूर तालुका अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली.  तसेच किनवट तालुका कार्यकारिणीत नवीन सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. व निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ३

शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

  किनवट,दि.५ : शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन आज(दि.५) उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतयाजवळ मुख्य कार्यक्रम झाला.ध्वजवंदन प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. सामुहिक वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील,प्रा.सुभाष गडलिंग व गंगाधर कदम यांनी घेतली. याठिकाणी शहर व परिसरातील बौद्ध बांधव, भगिनी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.    शहरातील सिद्धार्थ नगरातील   जेतवन बुद्ध विहारात आज(दि.५) प्रियदर्शी सम्राट अशोक विजयादशमी तसेच ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यातआला.बौद्ध संस्कार विधी  प्रा.सुबोध सर्पे,प्रा.सुभाष गडलिंग व भारतीय बौध्द महासभाचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी घेतला.पंचरंगी ध्वजारोहण प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दादाराव कयापाक, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, नितिन कावळे,सुरेश जाधव,माधव कावळे,वसंत सर्पे, गंगाधर कावळे,प्रकाश पाटील,यादव नगारे,प्रा.रविकांत सर्पे, उपप्राचार्य राऊत, आत्मानंद सोनकांबळे,