Skip to main content

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते कोठारी पुलाचा शुभारंभ




किनवट प्रतिनिधी:-  किनवट माहूर तालुक्याच्या विकासाबाबत मी नेहमीच जबाबदारीने काम केले आहे. या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने येथील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो. कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणिवेतूनच कोठारी पुलासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळून दिला. नव्या पुलामुळे  या भागातील शालेय विद्यार्थी,शेतकरी व नागरिकांना मी जीवघेण्या प्रवासातून कायमस्वरूपी मुक्त केले याचा आत्मिक समाधान लाभत आहे असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.

जवळपास तीन दशकापासून प्रलंबित असलेल्या किनवट ते शनिवारपेठ मार्गावरील कोठारी पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी कोठारी येथे  संपन्न झाला त्यावेळी आ भीमराव   केराम अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते व्यासपीठावर कॉ गंगारेडी बेनमवार, कोठारीचे सरपंच गेडाम, बोधडी खुर्दचे उपसरपंच डॉ नामदेव कराड, अनुसूचित जनजाती आयोगाचे गोवर्धन मुंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी आ भीमराव केराम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व कुदळ मारून पूल बांधकामाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आलायाप्रसंगी पुढे बोलताना आ केराम म्हणाले की माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी मी संघर्ष केला. आमदार नसतानाही लोकहितांसाठीच  शासन प्रशासनासी झगडत राहिलो. यापूर्वी केवळ 18 महिन्याचा आमदार असताना सिंचन शिक्षण रस्ते व पिण्याच्या पाण्यासाठी निधी खर्च करताना कधीही हात आखडता घेतला नाही या वेळेला पाच वर्षे मिळाली परंतु  सरकार आमचे नव्हते त्यातच सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट उभे राहिल्याने  अपेक्षित विकास निधी खेचून आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाचा काळ वगळता व नवीन सरकार स्थापनेचा कालावधी पाहता या वेळेसही माझ्याकडे केवळ 18 महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे. या 18 महिन्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा माझा कसोशीचा प्रयत्न राहील तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने नैतिक जबाबदारी व कर्तव्य भावनेतूनच काम करण्याचा माझा स्वभाव आहे आणि याच भावनेतून मी कोठारी पुलासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि यश मिळाले नवीन पुलाच्या माध्यमातून मी या भागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जीवघेण्या प्रवासातून कायमचे मुक्त केले याचे मला आत्मिकसमाधान लाभत आहे. किनवट मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयवादावरून त्यांनी माजी आमदाराला चिमटा घेतला.आमदार झाल्यानंतर  स्थानिक विकास निधी काय असतो याची जाण नसणाऱ्यांनी कोठारी फुलाच्या बांधकामा संदर्भात वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळ काढल्याचे ते म्हणाले. राजकीय विरोधक म्हणून विकास कामांची स्पर्धा असावी परंतु श्रेयवादाची स्पर्धा नसावी असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला येत्या पावसाळ्यापूर्वी कोठारी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम करणाऱ्या संस्थेला दिल्या आहेत. कॉ गंगा रेडी बैनमवार, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, गुत्तेदार उत्तम जाधव आदींनी आपापल्या मनोगतातून कोठारी नाल्यावरून पावसाळ्याच्या दिवसात होणारे अपघात व जीवघेण्या प्रवासाबद्दल  माहिती देत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन कराड सर यांनी केले तर भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले या उद्घाटनाच्या कार्यक्रमास भाजपचे नेते अनिल तिरमनवार, गोकुंदाचे सरपंच अनुसया संजय सिडाम, उपसरपंच सरू भाई , अकबर खान ,नगरसेवक अजय चाडावर ,अनिरुद्ध केंद्रे, विवेक केंद्रे ,निळकंठ कातले ,संतोष मरस्कोल्हे, सुनील मच्छेवार ,शासकीय गुत्तेदार संघटना , कोठारी शनिवारपेठ, मदनापुर, दरसांगवी, दाभाडी, कोपरा, यंदा पेंदा, नागसवाडी, बोधडी खुर्द यासह जवळपास 15 ते 20 गावातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोठारी पुलासह गोकुंदा येथे ठाकरे चौक ते मंगाबोडी रस्त्याचे सुधारण कामाचे भूमिपूजन ही करण्यात आले तसेच माहूर येथील बाह्य वळण (बायपास)रस्त्याची सुधारणा 250 लक्ष, बाह्य वळण रस्ता सुधारणा 250 लक्ष,मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय ईमारत बांधकाम 625 लक्ष,महसूल अधिकारी वर्ग 2,3,4  निवासस्थान बांधकाम 1297लक्ष अशा कोट्यावधी रु च्या विकास कामांचे उदघाटनही आ भिमराव केराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी  नगराध्यक्ष फिरोज दोसानी,श्याम भारती महाराज,धरम सिंग राठोड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.