शीर्षक-दिन दिन दिवाळी
स्वयंप्रकाशी दिवे दारात
काळोखाचा न अंश जिथे
कृतज्ञ संवेदनांनी सुसज्ज
पणत्यांची ही आरास इथे
परंपरागत वाटेवरती त्या
नकोय दिशाहीन चालणे
गरज, कारण न जाणता
केवळ अनुकरण करणे
वैज्ञानिक कार्यकारणभाव
नि स्नेहसंबंधाचा घेत ठाव
उजळवायला हवे खरंतर
सुंदर हृदयाचे सुंदर गाव
दिवा अंतरीचा हा पेटवून
विचार व्हावेत प्रकाशित
समाजोपयोगी कर्मांनी
मानवजात दिसावी हर्षीत
सुवासिक पानाफुलांची
अन् औषधी वनस्पतींची
मनोवेधक ठरावी रांगोळी
हसऱ्या, प्रसन्न निसर्गाची
प्रत्येकाच्या मुखी भरवावा
प्रेमळ संवादाचा प्रसाद
गोड, सुमधुर आठवणींचे
ओठी उमटावे पडसाद
बेमालूमपणेच फुटावेत
आत्म समाधनाचे फटाके
जागोजागून ऐकू यावेत
सामुहिक हास्याचे धमाके
अंगोपांगी शोभून दिसावे
सद्गुणांचे नित्य परिधान
लक्ष नात्यांच्या नक्षत्रांनी
उजळावे हर घर आंगण
मीता अशोक नानवटकर
9823219083.
सावनेर,नागपूर.
Comments
Post a Comment