माहुर येथील पत्रकारावर झालेल्या गुन्ह्याची योग्य चौकशी करुन न्याय द्यावा - प्रेस सं. व पत्रकार सेवा संघाचे मा. तहसिलदार किनवट यांना निवेदन
किनवट :-
दैनिक पुन्यनगरीचे माहुर प्रतिनीधी सरफराज दोसाणी यानी दि.३०/०९/ २०२२ रोजी माहुरचे ग्रामिण रुग्णालय सलाईनवर तर दि.०३/१०/२०२२ रोजी माहुरच्या रुग्णालयात आरोग्य सेवेची ऐशी तैशी' या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केली होता. या बातमीचा राग अनावर धरून माहुर रुग्णालयात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेले डॉ. निरंजन केशवे यांनी दि.०८/१०/२०२२ रोजी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यान पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे पत्रकार सरफराज दोसाणी यांचे म्हणने आहे. असे असल्यास सदरचा प्रकार हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खिळखिळा करणारा असून लोकशाही हितार्थ बातमी करणा-या माध्यमाच्या प्रतिनीधीची मुस्कटदाबी करणारा आहे.
करीता या प्रकरणात योग्य चौकशी करून योग्य तो न्याय दयावा या आशयाचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व मराठी पत्रकार परीषद वतीने मा. तहसीलदार किनवट यांना देण्यात आले.
या निवेदनावर मराठी पत्रकार परीषदेचे अॅड. मिलींद सर्पे, मलीक चव्हाण, कामराज माडपेलीवार व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, आशिष शेळके, राजेश पाटील, सय्यद नदीम, विशाल गिमेकर, प्रणय कोवे, नसीर तगाले, मारोती देवकते, रमेश परचाके, शेख फारुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment