Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

आदिवासी प्रकल्प समितीच्या महिला सदस्यापदी वनमाला तोडसाम यांची निवड सारखणी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार.

  प्रतिनिधी - मजहर शेख, सारखणी सारखणी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यलय किनवट च्या प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समितीवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनाच्या आदिवासी विकास विभागाने केल्या आहेत. यामध्ये अध्यक्ष म्हणून ऍड प्रकाश गेडाम यांची नियुक्ती झाली. अशासकीय सदस्य म्हणून नारायणराव सिडाम,प्रा.विजय खूपसे,संजय माझळकर,गणपत मडावी,नामदेव कातले,व महिला सदस्या म्हणून सारखणी ग्रामपंचायत चे महिला सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.दि.२३ मे रोजी सारखणी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.वनमाला तोडसाम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जंगोम दल नांदेड जिल्हा अध्यक्ष अंकुश आडे , विकास कुडमते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष,धनराज पेन्दोर,गोपाल गेडाम, तसेच ग्राम पंचायत येथील ग्राम विकास अधिकारी एच.एम.वाडेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते.

किनवट येथे राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

किनवट:- आज किनवट येथे राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 297 वी जयंती किनवट व चिखली फाटा  अहिल्याबाई होळकर चौक येथे साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थित किनवट माहूर माजी.आमदार प्रदीपजी नाईक  साहेब युवा नेते कपिल नाईक ,शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, अनिल पाटील कराळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे ,दिशा समिती अध्यक्ष मारुती सुंकरवार, माजी नगराध्यक्ष के मूर्तीची ,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार , ज्येष्ठ नेते करपुडे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन कोल्हे ,माजी उपसभापती भावराव राठोड, काँग्रेसचे युवा नेते आशिष पाटील , गोर सेना तालुका अध्यक्ष कैलास राठोड , एडवोकेट राहुल नाईक , अमीत नाईक,कपिल रेड्डी, बंटी पाटील जोमदे, आशिष केवलसिंग नाईक, अजित खान पठाण, अजित साबळे, शेख अफसर, अश्विन पवार, जयंती उत्सव समिती बालाजी बामणे, आशुतोष ठोंबरे, पप्पू सातपुते ,माधव नरोटे, मनोहर श्रीरामे, शिवम देवकते ,रोहित भगत, रामेश्वर केसाळे, संतोष श्रीरामे मनोहर दबडे, अडकिने संतोष ,शिवा पवार ,बापूसाहेब पाटील, पत्रकार आशिष शेळके, बळीराम भ

बौद्ध वधु- वर व पालक परिचय मेळावा २०२२यशस्वीरीत्या

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:-  दि.29 मे रोजी संपन्न झालेला बौध्द समाज वधु वर व पालक परिचय मेळावा२०२२ यशस्वी रित्या पार पडला या मेळाव्यासाठी मराठवाडा तसेच विदर्भातुन वधु व वर यांनी आपली नाव नोंदणी करून परिचय करून दिले यात एकूण 113 वधू वरानी सहभाग नोंदवून आपला परिचय करून दिला व हा परिचय मेळावा योग्य उद्देश साध्य होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून शिक्षणमहर्षी प्राचार्य मोहनराव विठ्ठलराव मोरे साहेब, उदघाटक म्हणून आदरणीय मनीषभाऊ कावळे जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी नांदेड,इंजि.उल्केश कावळे, आदरणीय इंजि. प्रकाश नगारे साहेब, इंजि. भारत कानिंदे, इंजि. सिद्धार्थ पाटील,इंजि. जगन्नाथ भवरे, मंडळाचे अध्यक्ष राजेश भगत, सचिव, अरविंद घुले, कोष्याध्यक्ष शेषराव घुले, मार्गदर्शक सुनील भरणे,, शंकर कावळे, चंद्रमुनी भरणे,गुणवंत भगत, भास्कर भगत, प्रवीण घुले,विठ्ठल भवरे,सुरेश नगारे, इंजि.नागनाथ पाटील मुकुंदराज पाटील, दिलीप भवरे, भिमराव घुले,अशोकराव पाटील, अशोकराव माधवराव भगत, सुखदेव येरेकर, कोंडीबा वासाटे, सचिन पाटील, सचिन मुनेश्वर,प्रेमदास घुले,कैलास पोपलवार,संदीप भालेराव, तर

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सचिवपदी शेख परवीन यांची निवड

✍🏻 Rajesh patil किनवट ता.प्र. :-  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी  युवा नेते राहुल गांधी  अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष नेता डिसूजा  महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश  यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार  व व राष्ट्रीय ओबीसी सेलचे समन्वयक प्रमिल् नाईक यांच्या प्रयत्नाने  परवीन शेख यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली   किनवट सारख्या मागास दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या येथील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष मिस नीता डिसूजा यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीत शेख परवीन यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातीलकाँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे

विमल मुदाळे यांच्या "शब्दचकोर" गझल संग्रहात रसिकांचे अंतर्मन- समिक्षक :रूचिरा बेटकर नांदेड

         कविता अंतर्मनाचा ठाव घ्यायला लागते तेव्हा आपसुकच रसिक त्या ओळींच्या मध्ये डुंबायला लागतो. कवितेचा आशय, कविच जगणं या गोष्टी कधी-कधी भिन्न असू शकतात. पण कविच सोसणं, कविच्या सोसण्याची सार्थकता आणि वास्तव यांचे तौलानिक तरंग काव्यातून उमटत असतात.                                        त्यातल्या त्यात कमी शब्दात अधिक मोठा आशय चिमटीत धरून रसिकांवर गुलाल उधळल्या सारखा आशय उधळता येतो ,तो गझलेतूनच!   मग ह्रदयाचा ठाव घेत आपल्या रोजच्या जगण्यात आणि वागण्यात देखील गझल बेमालूम पणे मिसळून जाते. गझल काय..? आणि त्याचे तंत्र काय यांच्या खोलात मी शिरू इच्छित नाही.  कारण, माझा गझल शास्त्राचा अभ्यास नाही. पण सहजच,गझलकार विमल मुदाळे यांचा शब्दचकोर हा संग्रह माझे हाती पडला, व  मी चकोर पक्ष्यापरी त्यातील शब्दांकन व गझलीयतचे प्राशन केले. संग्राहाच्या सुरूवातीलाच इलाही जमादार सरांच्या लिहिलेल्या...             "बंद घराच्या उघड्या खिडक्या आत असावे कुणीतरी...| दरवळणारे  सूर सभोती गात असावे कुणीतरी...|"  या सुंदर ओळीनी सुरूवात केली आहे. याच बरोबर पतीसाठी ही गझलेची गुंफण पुर्णपणे त्यांना समर्पित

हमालांच्या कमतरतेमुळे धान्य पुरवठा विस्कळीत ;शिधापत्रिका धारकांची होतेय गैरसोय

  किनवट,ता.२८ : वहातुक ठेकेदारकडे असलेल्या हमाल कमतरतेमुळे किनवट गोदामाअंतर्ग असलेल्या रास्त भाव दुकानदारांना दोन दिवस उशिरा धान्य मिळणार आहे.यामुळे गोरगरिब असलेल्या शिधापत्रिका धारकांनाही दोन ते तिन दिवस उशीरा धान्य मिळणार असल्याने शिधापत्रिका धारकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.     वारंवार होणारा हा प्रकार टाळण्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाने  याकडे लक्ष देऊन हा प्रकार कायमचा निकाली काढावा,अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद सर्पे यांनी केली आहे. अगोदरच पुरवठा विभाग अन्नधान्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे दोन महीने मागे चालत आहे.एप्रिल महीन्याचे धान्य आत्ता मे च्या शेवटच्या आठवड्यात गोदामात उपलब्ध झाले आहे. यातच वहातूक ठेकेदारकडे हमालांची कमतरता आहे.यामुळे आज(ता.२८)व सुट्टी असल्याने उद्या(ता.२९) गोदामातून धान्य पुरवठा होणार नाही.धान्य न मिळाल्याने गोरगरिबांच्या चुली पेटण्यात दिरंगाई होणार आहे. हमालांचा प्रश्न वहातूक ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था करुन त्वरीत सोडवावा,अशी मागणीही सर्पे यांनी केली आहे.

कृष्णप्रिय ज्येष्ठ नागरिक संघ कराटे वर्गातील चिमुकले व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान

  तालुका क्रिडा अधिकारी उटांवरुन हाकतात शेळ्या... किनवट तालुका प्रतिनिधी : प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य् पसरले असल्याचे लक्षात घेवून किनवट येथील क्रिष्णप्रीय जेष्ठ् नागरीक संघ व कराटे वर्गाच्या चिमुकल्यांनी व मॉर्निग वॉक ग्रुपने 20 मे रोजी क्रीडा संकुलाच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्य् स्व्च्छता अभियान राबविल्याने शहरवासीयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 20 मे रोजी क्रीडा संकुलाचा 11 वा वर्धापनदिन असतांना या परिसरात तालुका क्रीडा अधिकारी व संबंधीत अधिकाऱ्याने कुठलीही दखल न घेतल्याने शहरातील विकासप्रेमी तीन संघटनानी एकत्र येवून क्रीडा संकुल परिसरात स्व्च्छता अभियान राबविले यात प्रामुख्याने नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ् नागरीक संघटनेचे डॉ. अशोक चिन्नावार, सेवानिवृत्त् पोस्ट् मास्तर् नार्लावार, उद्योजक बि.ए.कोंडे, दिलबर बदाने, उमाकांत नार्लावार, अशोक जयस्वाल, माजी उपनगराध्यक्ष राजु उप्प्लवार, कराटे मास्तर् तथा,सौ लक्ष्मीबाई  येशिमोड सेवाभावी संस्थांनी किनवट अध्यक्ष संदीप येशीमोड, ॲङ दिली

मुस्लिम समाजातील१० जणांनी दलित समाजावर केला हल्ला, चार जखमी;पैकी एक गंभीर जखमी

  किनवट,दि.१९: लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे गाणे वाजविणे बंद करा व हींदी गाणे लावा,आम्हाला नाचायचे आहे असे म्हणत एका समाजाच्या १० जणांनी मागासवर्गीय असलेल्या चार जणांना फायटरने मारुन जखमी केले.त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरला पाठविण्यात आले आहे.   ही घटना बुधवारी(दि.१८)रात्री पावने नऊ वाजता समता नगर  येथिल संजय भरणे यांच्या घरासमोर व अभय नगराळे यांच्या घरात घडली.या प्रकरणात एका समाजाच्या १०जणांनी या प्रकरणातील साक्षिदारास फायटरने मारून जखमी केले.तसेच घरी जाऊन सांगितले या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमा केली व या प्रकरणातील फिर्यादी व साक्षिदार हे अनुसूचित जाती-जमातीचे असल्याचे माहीत असुनही हातात लोखंडी रॉड,पाईप,दगड व फायटर घेऊन घरात घुसून फिर्यादी व साक्षिदारांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना जबरी दुखापत केली.तसेच अश्लील व जातीवाचक  शिविगाळ करुन गंभीर जखमी केले.  या प्रकरणात गंभीरपणे जखमी झालेले राहुल भगत यांना पुढील उपचारासाठी नागपूरला संदर्भित करण्यात आले आहे. या प्रकरणी सुधाकर रामा भगत(वय५२),धंदा मिस्त्रि

डाॅ. ज़हीरूद्दिन पठान ज़ीरो माईल आयकॉन अवार्ड-2022 से सम्मानित

नागपुर:- ज़ीरो माईल फाउंडेशन, नागपुर के द्वारा ज़ीरो माईल राष्ट्रीय साप्ताहिक अखबार के 17 वें वर्ष में पदार्पण के उपलक्ष्य में विशेषांक का विमोचन एवं ज़ीरो माईल आईकॉन अवार्ड - 2022 समारोह का आयोजन हॉटेल हॅरिटेज, वी.सी.ए. ग्राउंड के पास सिव्हिल लाईन्स, नागपुर में 15 मई, 2022 को संपन्न हुआ। इस समारोह में देश-विदेश के लगभग बीस ऐसे लोगों को सम्मानित किया गया, जो साहित्य, भाषा, समाज, चिकित्सा, खेल, राजनीति आदि विविध क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान देने वालों को अवार्ड देकर सम्मानित किया गया।  इस समारोह में टिपू सुलतान ब्रिगेड के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  डाॅ. ज़हीरूद्दिन पठान को भी मा. रमेश बंग (पूर्व मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. विकास ठाकरे (आमदार, पश्चिम नागपुर), मा. किशोर कन्हेरे (प्रवक्ता, शिवसेना), मा. अनिल अहिरकर (रा. काँ. पा.), मा. राजाभाऊ टांकसाले (शिक्षा महर्षी), डाॅ. विमल कुमार (कॅलिफोर्निया, अमेरिका), डाॅ. शहाबुद्दीन शेख (पुणे) आदि की उपस्थिती में ज़ीरो माईल आयकॉन अवार्ड - 2022 (शिक्षा रत्न) से सम्मानित किया गया। इस सम्मान के लिए डाॅ. ज़हीरूद्दिन पठान जी ने टिपू सुलतान ब्रिगेड

टिपू सूलतान ब्रिगेडतर्फे देवीनगरतांडा येथे ईद मिलन निमित्ताने अनोखा कार्यक्रम संपन्न

  कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात आले. कार्यक्रमास टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली यांची उपस्थिती. किनवट : टिपू सुलतान ब्रिगेड नांदेडच्या वतीने मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत किनवट तालुक्यातील देवीनगर येथे आज 16 मे, 2022, सोमवार रोजी ईद मिलन कार्यक्रम अत्यंत अनोख्या रीतीने संपन्न झाला.         टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात.           टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड तर्फे यावर्षीची ईद किनवट तालुक्यातील देवीनगर तांड्यातील आपल्या गोर बंजारा बांधवांसोबत साजरी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना शिरखुर्माची मेजवाणी देण्यात आली आणि अनाथ व गरजू मुलांना कपड़े भेट करण्यात आले.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देव

प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा

किनवट /ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस,किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,दै. साहित्य सम्राट चे ता.प्रतिनिधी मा.आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्यावतीने किनवट येथील "आज की न्यूज" कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक  कापून व शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.     तसेच गोकुंदा येथे अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांच्या नेतृत्वात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.   तसेच मदनापूर येथे विनोद पवार यांच्या नेतृत्वात व ता.अध्यक्ष आशिष शेळके,पत्रकार प्रणय कोवे,राज माहुरकर,विशाल गिम्मेकर,रमेश पारचके बंधू सह गावातील सरपंच व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.       किनवटच्या  सामाजिक, राजकिय व पत्रकारितेच्या क्षेत्रात  गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षितपत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेर

कोठारी(चि)येथे बुद्ध-भीम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम १९ मे रोजी

  किनवट,दि.१५: भगवान बुद्ध, सम्राट अशोक, संत सेवालाल महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगितांचा कार्यक्रम कोठारी(चि.ता.किनवट)येथे गुरुवारी(दि.१९)रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदिप नाईक हे राहणार आहे. भारतीय बौद्ध महा सभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे उद्घाटन करणार आहेत.या प्रसंगी किनवटच्या संथागार व्रध्दाश्रमाचे संचालक करुणा व अरुण आळणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.    याप्रसंगी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सूत्रसंचालन एड.सचिन गिमेकर हे करणार आहेत.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्यासह भारतीय महीला शाहिर स्मिता पाटील व जॉली मोरे व संच (मुंबई)यांचा तुफानी शाहिरी जलसा होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजक सांची बुद्ध विहार हे आहे,तर निमंत्रक गोकुंदा(ता. किनवट)चे माजी सरपंच प्रविण मँकलवार हे आहेत.    परिसरातील जनत

किनवट शहरात विजेचा लपंडाव तर नागरीक उकाड्याने त्रस्त

  किनवट प्रतिनीधी :  ( किनवट तालुक्यात विज अनेक वेळा येजा करत आहे ) सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असुन तालुक्यात व ग्रामिण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरु आहे तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे . वीज पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहे तसेच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उपकरणे निकामी होण्याची भीती वाढली आहे गर्मीमुळे लहान मुलासह अबालवृध्दानां याचा त्रास सहन करावा लागत आहे . विजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन, कुलरचा वापरही निट करता येत नाही त्यामुळे परीसरातील जनता त्रस्त आहे दर पाच - पाच मिनीटात वीज खंडीत होत असल्याने नागरिक वीज महावितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे  थोडाही वारा सुटला कि लाईन गुल होते या बाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते  विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे. तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ किती ला

किनवट डॉक्टर असोसिएशन तर्फे त्या कृत्याचा तिवृ शब्दात निषेध

  ✍🏻 राजेश पाटील प्रतिनिधी किनवट:- किनवट येथील डॉ. सुकंरवार यांच्याकडे कामावर असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉ. सुंकरवार यांनी  केलेले दुष्कृत्य निंदनिय आहे अमानविय आहे त्यामुळे डॉक्टर असोसिएशन( आय एम ए) या घटनेचा असोसिएशन तिव्र शब्दात निषेध करत आहे असे उदगार  डॉ.पत्कीसह सर्व डॉक्टर असोसिएशन डॉक्टर सदस्य यांनी केला आहे. साने गुरुजी हॉस्पिटल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी डॉक्टर बेलखोडे यांनी  असे सांगितले कि ज्या ज्या डॉक्टरांनी मुलीवर उपचार केला तो मुलीचा जीव वाचावा या दृष्टिकोनातुन केला किनवट मध्ये जे अफवांचे पेय फुटले आहे कि डॉक्टर असोसिएशन डॉ. सुंकरवार यांना पाठीशी घालत आहे हा आरोप निराधार तथ्यहिन आहे असे मत डॉ. असोसिएशन तर्फे मांडण्यात आले किनवट  डॉक्टर असोसिएशन हि नांदेड IMA अंतर्गत काम करते अजुन किनवट मध्ये IMAला सुरवात झाली नाही या वेळी डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पत्की, डॉ.मोहन अकोले(IMA) सदस्य, डॉ.जन्नावार, डॉ. सुर्वे, डॉ. संजय लोमटे, डॉ. तेलंग, डॉ. उपासनी, डॉ.महेंद्र कांबळे, डॉ. तोंडारे, डॉ. सोरटे, डॉ. घडसींग, डॉ.राहील शेख व पत्रकार बांधव आशिष देशपांडे, नसीर त

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांचा सन्मान

  लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खंडाळाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ॲड.उदय दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक करडखेले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, माढा तालुका उपाध्

आज एड. मिलिंद सर्पे यांचा वाढदिवस त्या निमित्त पँथर, पत्रकार, वाचनालय संचालक, वकील पर्यंत त्यांचा प्रवास हा 'स्फुट लेखात वाचुया'

*||मिलिंद नामा||* *-एड.मिलिंद सर्पे, किनवट*   आज अनेक बौद्ध कुटुंबातील पालक हे आपल्या मुलाचे नांव *मिलिंद* हे ठेवतात.यात काही नाविन्य नाही.कारण १९५६ ला महार समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहानाला हाक देत हिंदू धर्माचा त्याग करून समतावादी बौद्ध धम्माचा स्विकार केलेला आहे. *मिलिंद* हे बौद्ध संस्कृतील एक प्रमुख नाव आहे.      माझे वडील हे *मिलिंद* महाविद्यालयात शिकूण गावी किनवट ला परत आल्यांतर माझा जन्म १९६४ साली झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "आदर्श विद्यार्थी हा मिलिंद सारखा घडावा व आदर्श शिक्षक हा भंते नागसेन सारखा असावा",या उद्दात हेतूने औरंगाबाद येथिल नागसेन वन परिसरात *मिलिंद* महाविद्यालयाची १९५० मध्ये सुरुवात केली होती. याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने माझ्या वडिलांनी माझे नाव*मिलिंद*ठेवले असावे,असेच मला वाटते.या सुप्त भावनेतूनच समाजाची फुल ना फुलाची पाकळी एवढी सेवा करण्याची प्रेरणा मला मिळत गेली.       माझे वडील उद्धव सर्पे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या *मिलिंद* महाविद्यालयाचे सन १९५०-६० या दशकातील सायंस शाखेचे विद्

मोकाट गाढवांना कोंडवाड्यात टाकणे व उचित कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय यांना निवेदन

  ता. प्र. किनवट :- किनवट शहरात वाळुंचे दळण  वळण करण्यासाठी गाढवाचे मालक गाढवांचा सर्रार्स वापर करतात व गाढवांचा वापर करून त्यांना रस्त्यावर मोकाट सोडुन जातात यांचाच नाहक त्रास किनवट येथील वयोवृध्द महिला , बालके, शालेय विद्यार्थी यांना या बाबींचा सामना करावा लागतो नुकतेच काल दोन दुचाकी वाहक जात असतांना दोन गाढव सुसाट पळत अचानक समोर आल्याने दोघांनाही मुक्का मार लागला अशा प्रकारे जर नाजुक जागी मार लागल्यास नागरीकास जीवस मुकावे लागेल याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरीक करीत आहे तरी अशा प्रकारे मोकाट गाढव सोडणाऱ्या मालकावर कठोर कार्यवाही करून मोकाट गाढवांना कोंडवाडयात डांबुन योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील व (टिपुसुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष )सय्यद  नदीम यांनी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांना दिले आहे व एक प्रतिलिप मा.तहसिलदार कार्यालय किनवट यांना सादर केले आहे.

मुहम्मद पैगंबर सर्वासाठी अभियान 2022 अंतर्गत अविस्मरणीय ऐतिहासिक वंचित घटका सोबत ईद मिलन कार्यक्रम..

सामान्यता ईदच्या दिवशी मुस्लिम कुटुंबात आई शिरखुर्मा करते व आम्ही खातो परंतू ही ईद आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय ईद आहे कारण आज आम्ही मुलांनी शिरखुर्मा बनवला आहे आणी आमच्या ( बहुजन) मातां खाणार आहेत... -शेख सुभान अली *जाती आणि धर्मासाठी लढण्याऐवजी युवकांनी अखिल मानव जातीच्या कल्याणाची लढावे -* :- *मा. शेख सुभान अली.* *मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत काल जालना शहरात टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉल मध्ये संपन्न झाला. टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण 358 तालुक्यात मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान राबविण्यात येत आहे.*  *मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे उत्पन्न प्रतिकूल परिस्थितीत सामूहिक ईद साजरी करण्यात आली नाही. पण यावर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त गरजू, गरीब, निराधार, अनाथ मुलं, विधवा स्त्रिया, दिव्यांग जन,शोषित,पिडित यांच्यासोबत ईद साजरी करण्

वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशाला कंटाळून महावितरणचे कर्मचारी जाणासामुहिक रजेवर

  किनवट : कार्यकारी अभियंता यांच्या विज बिल वसुलीसाठी चालू असलेल्या  प्रचंड दबावामुळे  व मे महीन्यात प्रचंड तापमान असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानूसार घेण्यात येणाऱ्या काळजी ऐवजी कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वसुली करण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे तालुक्यातील विज कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झााले आहेे.यामुळे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे लवकरच पंधरा दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.    विज कर्मचाऱ्यांकडे केवळ विज बिल वसुलीचे काम नसून विज वाहीणी देखभाल दुरुस्ती चे काम देखील २४ तास पहाण्याची जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यातील तापमानाच्या उखाड्यामुळे व वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे विज वाहीण्यावर व रोहीत्रांवर प्रचंड लोड वाढल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,वायर तुटने या घटना वाढल्यामुळे विज ग्राहकांना अखंडित विजपुरवठ्या ची सेवा देण्यासाठी अगोदरच अपुऱ्या असणाऱ्या विज कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. त्यातच कार्यकारी अभियंता यांचे तुगलकी आदेश सकाळी साडेसात पासू

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त लोहा येथे गौरव सोहळा संपन्न

लोहा, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लोहा तालुका नेहमीच समाजहिताचे कार्य हाती घेत उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा गौरव करत असल्याचे दिसून येते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोहा येथे नुकताच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मान्यवरांचा गौरव सोहळा संपन्न झाला. लोहा शहरात ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यादिवशी जन्मदिन असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातून व पत्रकारितेतून समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समिती सदस्य युवा सेना जिल्हा समन्वयक नवनाथ उर्फ बापू रोहिदासजी चव्हाण यांचा जन्मदिनानिमित्त व त्यांनी केलेल्या एकंदरीत केलेल्या विधायक कार्याचा आढावा घेऊन त्यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नांदेड जिल्ह्यातील व ल

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कामगारांचा सन्मान

  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त केले होते आयोजन पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दि.१ मे २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान व अल्पोपहार देऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक श्रीकांत कदम, सफाई कामगार हंगामी मुकादम सुर्यकांत रणखांबे,आरोग्य मुकादम नंदर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते परंतु सफाई कामगार यांचे काम उल्लेखनीय आहे. सफाई कामगार यांच्यामुळे सर्वत्र स्वच्छता राखण्याचे काम केले जाते. सर्वसामान्यांना स्वच्छ व निरोगी आरोग्यासाठी सफाई कामगारांचा मोठा सहभाग असतो. या त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कामगार बंधू-भगिनींचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र स

संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळा येथे महाराष्ट्र दिन साजरा. आशिष शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

किनवट :  महाराष्ट्र दिन हा १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६०  संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळा येथे महाराष्ट्र दिन साजरा. आशिष शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.       किनवट शहरातील गोकुंदा भागातील संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळा येथे महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहन हे पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण नंतर तिरंगी ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. शेवटी अपंग कर्मशाळा येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.          यावेळी संत तुकाराम महाराज निवासी अपंग कर्मशाळे