Skip to main content

कृष्णप्रिय ज्येष्ठ नागरिक संघ कराटे वर्गातील चिमुकले व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान

 

तालुका क्रिडा अधिकारी उटांवरुन हाकतात शेळ्या...

किनवट तालुका प्रतिनिधी : प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य् पसरले असल्याचे लक्षात घेवून किनवट येथील क्रिष्णप्रीय जेष्ठ् नागरीक संघ व कराटे वर्गाच्या चिमुकल्यांनी व मॉर्निग वॉक ग्रुपने 20 मे रोजी क्रीडा संकुलाच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्य् स्व्च्छता अभियान राबविल्याने शहरवासीयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

20 मे रोजी क्रीडा संकुलाचा 11 वा वर्धापनदिन असतांना या परिसरात तालुका क्रीडा अधिकारी व संबंधीत अधिकाऱ्याने कुठलीही दखल न घेतल्याने शहरातील विकासप्रेमी तीन संघटनानी एकत्र येवून क्रीडा संकुल परिसरात स्व्च्छता अभियान राबविले यात प्रामुख्याने नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ् नागरीक संघटनेचे डॉ. अशोक चिन्नावार, सेवानिवृत्त् पोस्ट् मास्तर् नार्लावार, उद्योजक बि.ए.कोंडे, दिलबर बदाने, उमाकांत नार्लावार, अशोक जयस्वाल, माजी उपनगराध्यक्ष राजु उप्प्लवार, कराटे मास्तर् तथा,सौ लक्ष्मीबाई  येशिमोड सेवाभावी संस्थांनी किनवट अध्यक्ष संदीप येशीमोड, ॲङ दिलीप काळे, ॲङ सुनिल येरेकर, संजय धोबे, रामदेव शर्मा, लोखंडे, सुरेश कावळे, मुंडे काका, अश्विन पवार, गिरिश वट्टमवार जेष्ठ् नागरीक संघटना व मॉर्निग ग्रुप आणि कराटे वर्गाचे विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? 

किनवट येथे शासनाच्यावतीने 10 वर्षापुर्वी किनवट गोकुंदा मार्गावरील विस्तीरण जागेवर क्रीडा संकुल बांधण्यात आले बंधीस्त् हॉलमध्ये विविध खेळासह बॅटमॅटन हॉल निर्माण केला आणि समोरील भव्य् मैदानात सकाळी फिरण्यासाठी व विविध खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरीक येत असतात पण या क्रीडा संकुलासाठी शासनाचा निधी उपलब्ध् असतांना प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी नांदेडला बसून येथील कारभार पहातात. देखरेखीसाठी दोन पहारेकरीही या ठिकाणी कार्यरत आहे एक पहारेकरी हजेरी लावून कामे करतो पण दुसरा पाहरेकरी दोन महिण्यापासुन बेपत्ता असून कामावर असला तर या ठिकाणी खेळासाठी येणाऱ्यावर अरेरावी करतो पण त्याच्यावर नियंत्रण ठेवले जात नाही परिणामी या परिसरात घाणीचे साम्राज्य् पसरले आहे व गाडवांचा मुक्तसंचार असल्याने घाणीचे साम्राज्य् पसरले आहे या गाडवांचा बंदोबस्त् कोण करणार हा प्रश्नही एैरणीवर आला आहे. विविध साहित्य् खरेदीसाठी काही महिण्यापूर्वी आले दोन लाख रूपये साहित्य् खरेदी केली पण आज त्या ठिकाणी लोखंडी अलमारी आहे बाकी साहित्य् कुठे बेपत्ता झाले या बेपत्ता होण्यासाठी जाबाबदार कोण? हा प्रश्नच् असून बॅटमॅटनचे दुरावस्था झाली असून त्या ठिकाणचे स्टाईल्स् उखडून गेले त्याठिकाणी खेळाडू ला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही या क्रीडा संकुलाचे सचिव तहसीलदार असून किमान त्यांनी दुरावस्था झालेल्या क्रीडा संकुलाकडे तातडीने लक्ष देवून या क्रीडा संकुलाच्या झालेली दुरावस्था तातडीने दूर करावी व या ठिकाणी असलेल्या पाहरेकरी यांना समज दयावी किंवा हाकलपट्टी करावे असे अपेक्षाही क्रीडाप्रेमींनी व्यक्त् केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...