Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा




किनवट /ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस,किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,दै. साहित्य सम्राट चे ता.प्रतिनिधी मा.आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.

  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्यावतीने किनवट येथील "आज की न्यूज" कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक  कापून व शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

    तसेच गोकुंदा येथे अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांच्या नेतृत्वात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

  तसेच मदनापूर येथे विनोद पवार यांच्या नेतृत्वात व ता.अध्यक्ष आशिष शेळके,पत्रकार प्रणय कोवे,राज माहुरकर,विशाल गिम्मेकर,रमेश पारचके बंधू सह गावातील सरपंच व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. 

     किनवटच्या  सामाजिक, राजकिय व पत्रकारितेच्या क्षेत्रात  गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षितपत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

     राजकिय क्षेत्रात अनेक पदावर त्यांनी काम केले उत्कृष्ट कार्य केले आहेत.यात नांदेड दक्षता समितीचे सदस्य,गोकुदा उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशा अनेक समिती वर काम करत व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा सम्पर्क व  अनुभव उपयोगी पडणार आहे..

   बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आनंद भालेराव हे पत्रकार क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून निस्वार्थ सेवेच्या व्रताने अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केली आहे व ते आजही करत आहेत.  त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...