Skip to main content

वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशाला कंटाळून महावितरणचे कर्मचारी जाणासामुहिक रजेवर

 


किनवट : कार्यकारी अभियंता यांच्या विज बिल वसुलीसाठी चालू असलेल्या  प्रचंड दबावामुळे  व मे महीन्यात प्रचंड तापमान असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानूसार घेण्यात येणाऱ्या काळजी ऐवजी कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वसुली करण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे तालुक्यातील विज कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झााले आहेे.यामुळे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे लवकरच पंधरा दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.

   विज कर्मचाऱ्यांकडे केवळ विज बिल वसुलीचे काम नसून विज वाहीणी देखभाल दुरुस्ती चे काम देखील २४ तास पहाण्याची जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यातील तापमानाच्या उखाड्यामुळे व वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे विज वाहीण्यावर व रोहीत्रांवर प्रचंड लोड वाढल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,वायर तुटने या घटना वाढल्यामुळे विज ग्राहकांना अखंडित विजपुरवठ्या ची सेवा देण्यासाठी अगोदरच अपुऱ्या असणाऱ्या विज कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे.

त्यातच कार्यकारी अभियंता यांचे तुगलकी आदेश सकाळी साडेसात पासून रात्री साडेआठ पर्यंत केवळ विजबिल वसुली करण्याचे आदश व सदर वसुलीचे काम दिलेल्या उदिष्टापर्यंत न झाल्यास शिस्तभंगाची,पगार कपातीची निलंबनाची व बदलीची कार्यवाही अशा गंभीर स्वरुपाच्या कार्यवाह्या करण्याची वारंवार ताकीद दिल्या जात आहे.

   यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तान व तनावामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. 

त्यामुळे कर्मचाऱ्यांची विज दुरुस्ती व देखभाल करण्याच्या कामावेळी मनस्थिती बिघडून अपघात ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारात पार्श्वभूमीवर कंटाळून तालुक्यातील महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे पंधरा दिवसांच्या सामुहिक रजेवर लवकरच जाणार असल्याचे कळाले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...