✍🏻 राजेश पाटील
प्रतिनिधी किनवट:-
किनवट येथील डॉ. सुकंरवार यांच्याकडे कामावर असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉ. सुंकरवार यांनी केलेले दुष्कृत्य निंदनिय आहे अमानविय आहे त्यामुळे डॉक्टर असोसिएशन( आय एम ए) या घटनेचा असोसिएशन तिव्र शब्दात निषेध करत आहे असे उदगार डॉ.पत्कीसह सर्व डॉक्टर असोसिएशन डॉक्टर सदस्य यांनी केला आहे.
साने गुरुजी हॉस्पिटल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी डॉक्टर बेलखोडे यांनी असे सांगितले कि ज्या ज्या डॉक्टरांनी मुलीवर उपचार केला तो मुलीचा जीव वाचावा या दृष्टिकोनातुन केला किनवट मध्ये जे अफवांचे पेय फुटले आहे कि डॉक्टर असोसिएशन डॉ. सुंकरवार यांना पाठीशी घालत आहे हा आरोप निराधार तथ्यहिन आहे असे मत डॉ. असोसिएशन तर्फे मांडण्यात आले किनवट डॉक्टर असोसिएशन हि नांदेड IMA अंतर्गत काम करते अजुन किनवट मध्ये IMAला सुरवात झाली नाही या वेळी डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पत्की, डॉ.मोहन अकोले(IMA) सदस्य, डॉ.जन्नावार, डॉ. सुर्वे, डॉ. संजय लोमटे, डॉ. तेलंग, डॉ. उपासनी, डॉ.महेंद्र कांबळे, डॉ. तोंडारे, डॉ. सोरटे, डॉ. घडसींग, डॉ.राहील शेख व पत्रकार बांधव आशिष देशपांडे, नसीर तगाले, गोकुळ भवरे, आनंद भालेराव, आशिष शेळके, राजेश पाटील, एड विलास सुर्यवंशी, सुरेश कावळे, रवी कानिंदे, बाळकृष्ण कदम, विजय जोशी आदि उपस्थित् होते.
Comments
Post a Comment