Skip to main content

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सचिवपदी शेख परवीन यांची निवड


✍🏻Rajesh patil

किनवट ता.प्र. :-

 अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी  युवा नेते राहुल गांधी  अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष नेता डिसूजा  महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश  यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार  व व राष्ट्रीय ओबीसी सेलचे समन्वयक प्रमिल् नाईक यांच्या प्रयत्नाने  परवीन शेख यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली   किनवट सारख्या मागास दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या येथील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष मिस नीता डिसूजा यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीत शेख परवीन यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातीलकाँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे

 आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महिला काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारणीत फेरबदल केले असून तळागाळातील निष्ठावान महिलांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महिलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष नीता डिसूजा यांनी महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीला नुकतीच मान्यता दिली असून त्या अनुषंगाने जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी २८मे रोजी काँग्रेस महिला कार्यकारिणी घोषित केली  यात किनवट येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ  कार्यकर्त्या शेख परवीन यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे शेख परवीन यांनी किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन  काँग्रेस ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक प्रेमील नाईक यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेख परवीन यांचे अभिनंदन होत आहे

 किनवट सारख्या ग्रामीण आदिवासी तालुक्यात माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक समाजातील महिलेला पक्षाचे सचिवपद मिळणे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे काँग्रेसचे  नेते प्रेमील नाईक यांच्या प्रयत्नामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व प्रेमील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संपूर्ण राज्यभरात महिलांची संघटनात्मक बांधणी करून दिलेली जबाबदारी सार्थ ठरवेन अशा प्रतिक्रिया शेख परवीन यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...