Skip to main content

मुहम्मद पैगंबर सर्वासाठी अभियान 2022 अंतर्गत अविस्मरणीय ऐतिहासिक वंचित घटका सोबत ईद मिलन कार्यक्रम..




सामान्यता ईदच्या दिवशी मुस्लिम कुटुंबात आई शिरखुर्मा करते व आम्ही खातो परंतू ही ईद आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय ईद आहे कारण आज आम्ही मुलांनी शिरखुर्मा बनवला आहे आणी आमच्या ( बहुजन) मातां खाणार आहेत...

-शेख सुभान अली


*जाती आणि धर्मासाठी लढण्याऐवजी युवकांनी अखिल मानव जातीच्या कल्याणाची लढावे -*

:- *मा. शेख सुभान अली.*




*मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत काल जालना शहरात टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉल मध्ये संपन्न झाला. टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण 358 तालुक्यात मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान राबविण्यात येत आहे.*


 *मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे उत्पन्न प्रतिकूल परिस्थितीत सामूहिक ईद साजरी करण्यात आली नाही. पण यावर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त गरजू, गरीब, निराधार, अनाथ मुलं, विधवा स्त्रिया, दिव्यांग जन,शोषित,पिडित यांच्यासोबत ईद साजरी करण्याचा, त्यांना नवीन कपडे भेट करण्याचा आणि त्यांना शीरखुर्मा खाऊ घालुन विशेषता पिडित घटकांना सोबत घेऊन ईद साजरी करण्याचा संकल्प आहे.*


 *कारण की समस्त मानव जात एकाच आई वडीलांची संतान आहे, त्यामुळे सर्व आपसांत भाऊ-बहिण आहेत. अल्लाह रब्बुल आलमीन म्हणजे सर्वांचा परमेश्वर आहे, मुहम्मद पैगंबर स.स. रहेमतुल आलमीन म्हणजे जगातील सर्व लोकांसाठी कृपावंत आहेत. म्हणून सर्व मानव जातीची जबाबदारी आमच्यावर आहे.*


*याच अभियान अंतर्गत आज जालना येथे टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने ईद अनाथ बालके, विधवा, वृद्ध आणि निराधार आई-बहिणी, दिव्यांग जन, शोषित, पिडित यांच्या सोबत साजरी केली.*


*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा जालन्याचे लोकप्रिय आमदार मा. कैलास गोरंट्याल हे आजारी असताना व डॉक्टरांनी कंप्लीट बेड रेस्ट चा सल्ला दिला असुन ही वंचित घटाकांसोबत साजरा होणाऱ्या या कार्यक्रमास शेवट पर्यंत उपस्थित होते त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभर व्यक्त करतो. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मा. शेख सुभान अली सर, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, अहमदनगर जिल्हाध्यक्ष फारूख मौलाना इ. उपस्थित होते.*

*मा. कैलास गोरंट्याल साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, राज्यातील जनता नेहमी फुले-शाहू-आंबेडकर विचाराच्या सोबत राहिलेली आहे. परंतु काही मंडळी समाजामध्ये विष पेरण्याचे काम करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा उद्योग करीत आहे. त्यांना कधीच यश मिळणार नाही. आणि जनतेने देखील त्यांच्या राजकीय डावाला ओळखलेले आहे. ही महत्वाची बाब आहे. त्यांनी पुढे सांगितले की टिपू सुलतान ब्रिगेडने रंजल्या-गांजल्यासाठी ईद मिलनचा हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम घेतल्यामुळे आपल्याला मनस्वी आनंद झालेला आहे.*


*असा कार्यक्रम आपण पहिल्यांदास पाहत आहोत.*

*टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,महाराष्ट्र राज्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समाजात रूजवित असतांना मुहम्मद पैगंबर स.स. यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेला महत्वपूर्ण संदेश समजून घेतला पाहिजे.ईस्लाम वर्ण-भेद, जाती-भेद मान नाही.आपण सर्व एकच आई-वडीलांची लेकरे आहोत अशी शिकवन देवून माणसांना जोडण्याचे काम केलेले आहे.*

*परंतु काही मंडळी समाजामध्ये तेढ आणि दुही पसरवित आहे. ही दुर्दैवाची बाब असून आजच्या युवकांनी खऱ्या अर्थाने समस्त मानव जातीच्या कल्याणाची लढाई उभारणे काळाची गरज असल्याचे देखील सुभान अली सर यांनी सांगीतले.*

*यावेळी अनाथ बालके, विधवा, वृद्ध आणि निराधार आई-बहिणी, दिव्यांग जन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांना भेट म्हणून कपडे आमदार कैलास गोरंट्याल, मा. शेख सुभान अली सर, डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या हस्ते वाटप करून सर्व उपस्थितांना शिरखुर्मा खाऊ घालून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.*

*सुरूवातीला अभियानाची भूमिका टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी स्पष्ट केली.जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी देखील आपले विचार व्यक्त करून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आणि सय्यद करीम बिल्डर यांचे अभिनंदन केले.*

*शेवटी टिपू सुलतान ब्रिगेडचे जालना जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक सय्यद करीम बिल्डर यांनी सर्वांचे आभार मानले.*


*याप्रसंगी राम सावंत, डॉ. विशाल धानुरे, शेख शकील, नंदाताई पवार, जावेद बेग, मोहमंद उस्मान मोमीन, शेख शमशोद्दीन, , रविंद्र गाढेकर, अफसर चौधरी, ॲड. कामरान खान यांची उपस्थीती होती या कार्यकरमाला यशसवी करण्यासाठी ,शेर जमाखानमजहर सौदागर, सलीम काजी, अडॅ.अयास सूभांनी,मुजमिल कुरेशी, मुफ्तार खान, हाफेज फारूख, चंद्रकांत रत्नपारखे, शेख वसीम,सलीम यासीन खान पठान, इम्रान बिल्डर, जावेद पठाण, ईसरार खान शेख सलीम पत्रकार,निसार कूरेशी,शेख मनसुर, सय्यद लतीफ,शेख मुजाहेद विठ्ठल चव्हान,भगवान सूतार,ईबाहीम खान, सिरगुळे, करीम लोहार बिल्डर, साजेद बिल्डर, नारायण वाढेकर, शेख जावेद, सतार बागवान,शेख शाकेर, इलियास मुसा, मजहर खान, अफसर मिर्झा, अबु बकर चाऊस, मोहम्मद अवेस, टिपू सूलतान ब्रिगेड ता.अध्यक्ष सलमान पठान,ता,अध्यक्ष शेर खान,शेख राजमहमद,शेख मोईन,सय्यद खालेद, मो,आवेस,रियाज कूरेशी,नदीम कूरेशी,तालेब बिल्डर,शेख फारूख आदिने परीश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आता मोहमंद बक्शी यांनी केले...*


*#मुहम्मद_पैगंबर_सर्वासाठी_अभियाध_2022*

*#वंचित_समाज_बांधवासोबत_ईद_मिलन_कार्यक्रम*



*संकल्पक:-मा.शेख सुभान अली*

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...