Skip to main content

विमल मुदाळे यांच्या "शब्दचकोर" गझल संग्रहात रसिकांचे अंतर्मन- समिक्षक :रूचिरा बेटकर नांदेड

 


       कविता अंतर्मनाचा ठाव घ्यायला लागते तेव्हा आपसुकच रसिक त्या ओळींच्या मध्ये डुंबायला लागतो. कवितेचा आशय, कविच जगणं या गोष्टी कधी-कधी भिन्न असू शकतात. पण कविच सोसणं, कविच्या सोसण्याची सार्थकता आणि वास्तव यांचे तौलानिक तरंग काव्यातून उमटत असतात.               

                        त्यातल्या त्यात

कमी शब्दात अधिक मोठा आशय चिमटीत धरून रसिकांवर गुलाल उधळल्या सारखा आशय उधळता येतो ,तो गझलेतूनच!   मग ह्रदयाचा ठाव घेत आपल्या रोजच्या जगण्यात आणि वागण्यात देखील गझल बेमालूम पणे मिसळून जाते.

गझल काय..? आणि त्याचे तंत्र काय यांच्या खोलात मी शिरू इच्छित नाही.  कारण, माझा गझल शास्त्राचा अभ्यास नाही.

पण सहजच,गझलकार विमल मुदाळे यांचा शब्दचकोर हा संग्रह माझे हाती पडला, व  मी चकोर पक्ष्यापरी त्यातील शब्दांकन व गझलीयतचे प्राशन केले.


संग्राहाच्या सुरूवातीलाच इलाही जमादार सरांच्या लिहिलेल्या...             "बंद घराच्या उघड्या खिडक्या आत असावे कुणीतरी...| दरवळणारे  सूर सभोती गात असावे कुणीतरी...|" 

या सुंदर ओळीनी सुरूवात केली आहे. याच बरोबर पतीसाठी ही गझलेची गुंफण पुर्णपणे त्यांना समर्पित केली आहे.

"सभोवताली तुझाच वावर काय आणखी हवे मला

माझ्यास्तव तू अमृतसागर काय आणखी हवे मला"

आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यावर तो आठवणीत जिवंत कसा असतो. हे या ओळीतून कळते.आघाताचे कणखर घाव झेलून आयुष्य किती सुंदर आहे. हे यातून स्पष्ट केले आहे.

खूप विद्राहक अंतर्मनातून हाक देत त्या म्हणतात...

"अंतरंगी वेदनेला कोरले मी श्वास वाटे काळजाला पोळणारा

आठवे सहवास मजला साजनाचा रंग प्रीतीचे चकोरी उधळणारा..."

आपले आयुष्य प्रेम, मोह, माया ,द्वेष, मत्सर ,नम्रता, विरह,आपूलकी, उत्साह, निसर्ग, शृंगार आणि भक्ति,असा

कोणता ना कोणता रंग उधळत असतो...परंतु विरहाचा रंग कधीच सुटणारा नसतो.

  

        जसं दुःख आयुष्याला चिकटलेले असते..तसेच सुखही त्यासोबत आलेले असते... म्हणून त्या म्हणतात की,

"तुझ्या सवे मी ताज पाहिला 

स्पंदनात ऋतु राज पाहिला...

पवन करतो गूज कळीशी

 फुलांचा अंदाज पाहिला..."

आठवाच्या विरहात बुडालेल्या या गझलकारे ने शब्दांनाच आपले जीवन बनवले आहे.त्यांच्या प्रत्येक शब्दात मला इलाही सरांची छाप दिसली...शब्दाला शब्द जोडून कधीच कविता किंवा गझल होत नाही.तर त्यात ओथंबून वाहणाऱ्या भावना आशयासह ओताव्या लागतात किंवा आशयाचे आकाश विस्तीर्ण होत, त्यास कवटाळणे चालू असतांना शब्दकळ्या फुलू लागतात! अन मग फक्त घमघमणे सुरू राहते!  या घमघमण्याला कधी कधी वेदनेचे सुगंधीपण जीवनाला व्यापून टाकत जाते!  शब्दांच्या साच्यात कवितेचे सुवर्ण आशयाच्या मुशीतून आकार घेतांना, रसिकांच्या काळजाचे होऊन जाते! ही अनुभूतीच कविच्या प्रतिभेला सर्वोच्च पुरस्कार असतो! मग कविला इतर कोणत्याच पुरस्काराची गरज भासत नाही.

"हौस कालची मौज कालची कुठे राहिली आता 

नविन आशा दिशा नवी नयनात कोणती आहे.

स्वप्न नसे नयनात चकोरी स्वप्नी साजन नाही 

असा कोणता दिवस आणखी रात कोणती आहे."

झालं ते सरलं म्हणत...

"विसाव्यासही फुरसत नाही मुळीच गे

सांग चाकोरी अजून कुठवर पळायचे..".

बस आता  जिवंत आहे तोपर्यंत पळायचेच आहे... म्हणून नव्या उमेदीने वाटचाल सुरू केली आहे विमल मुदाळे यांनी...

विरहात मुरून मनाच्या गवाक्षातून डोकावणाऱ्या भावना दुधाळ फेण्यासह आकाशात उडू लागल्या की, आपसूकच शब्दांमध्ये नवजात जन्माला आलेल्या पक्षाला कसं बळ मिळतं  तसंच बळ प्रत्येक गझलेमध्ये आलं आहे... 

"झुळूक एकच मागितली मी वाऱ्याची 

कुठे मागणी केली चंद्र अन् .ताऱ्याची

आयुष्य म्हणजे उंच डोंगरवरून खाली कोसळणाऱ्या धबधब्यासारखं ...! या प्रवासात हजारो प्रश्न आयुष्यावर वार करतातच. हा संघर्ष पावलोपावली सोसावाच लागतो.घाव पचवावेच लागतात! प्राक्तनातल्या वेदना भोगाव्याच लागतात. ही अस्वस्थता मुदाळे यांच्या ... "उडून गेले रंग जरी ते" या गजलेतून कळते.

याचबरोबर ,आयुष्याची आशयघनता सांगणार्‍या ...विष परीक्षा, व्याकूळ हरिणी, लपंडाव तर सुख दू:खाचा... अश्या गझलेतनं कळते.बाकी बरंच काही गझलेतील चकोरी ची मोहकता, रदीफ,मतलाबंद, काही मुक्तके जोडले गेले आहे. गजल म्हणजे बिनचूक शब्द मांडणी ,आशय यातील कला साधता येणे होय.

 विमल मुदाळे यांनी अशीच कला बहुआयामी अनुभूतिच्या जोरावर "शब्दचकोर" या आपल्या गजलसंग्रहात समर्थपणे सांधली आहे.

एकंदरीत  ४५ गजला आणि ७ मुक्तके या गजलसंग्रहात जोडलेली आहेत. साहित्य विश्वात दखल घ्यावा असाच हा 'शब्दचकोर' गझलसंग्रह आहे. निर्मल प्रकाशन,नांदेड यांनी हा संग्रह आकर्षक मांडणी व बांधणीसह प्रकाशित केला आहे! तसेच, पुस्तकाचे सुबक असे मुखपृष्ठ चि.आशय डोंगरे यांनी तयार केले आहे. 

सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय,कराड येथील प्रा.सौ.संध्या पाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहास  लाभलेली आहे. पैगंबरवासी इलाही जमादार यांच्या आशीर्वादासह तसेच मित्र परिवार, साहित्यिक परिवार स्नेही सहकारी यांच्या शुभेच्छासह  "शब्दचकोर" याचे अंतरंग शब्दसौंदर्यातून स्पष्ट उजळून निघाले आहे.

एवढ्या प्रगल्भ आणि वेगळ्या उंचीच्या "शब्दचकोर" या गजलसंग्रहास मी सौ.रूचिरा बेटकर  पुढील लिखाणास  मनःपूर्वक शुभेच्छा देते.


          बस एवढंच...!



रूचिरा बेटकर नांदेड

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला