Skip to main content

टिपू सूलतान ब्रिगेडतर्फे देवीनगरतांडा येथे ईद मिलन निमित्ताने अनोखा कार्यक्रम संपन्न

 


कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात आले.


कार्यक्रमास टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली यांची उपस्थिती.


किनवट : टिपू सुलतान ब्रिगेड नांदेडच्या वतीने मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत किनवट तालुक्यातील देवीनगर येथे आज 16 मे, 2022, सोमवार रोजी ईद मिलन कार्यक्रम अत्यंत अनोख्या रीतीने संपन्न झाला.

        टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात.

          टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड तर्फे यावर्षीची ईद किनवट तालुक्यातील देवीनगर तांड्यातील आपल्या गोर बंजारा बांधवांसोबत साजरी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना शिरखुर्माची मेजवाणी देण्यात आली आणि अनाथ व गरजू मुलांना कपड़े भेट करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवीनगर तांड्याचे श्री. नाथु नायक होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांची उपस्थिती होती. शेख सुभान अली सर यांनी सर्वप्रथम उपस्थित बंजारा बांधवांची, आई-बहिणींची माफी मागितली की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजऱ्या केल्या. इस्लाम शिकवितो की पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत, भाऊ-भाऊ आहेत. भारतात भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर आम्ही मुस्लिम होऊच नाही शकत. सर्व बहुजन बांधवांत एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की बहुजन युवकांनी काही  राजकारण्यांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये.

         कार्यक्रमाचे प्रस्ताविक टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले. त्यांनी मुहम्मद पैगंबर स.स. सर्वांसाठी अभियान आणि ईद मिलन कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली. गोर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप डी. राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतात टिपू सुलतान ब्रिगेड आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमाला देवीनगरचे प्रतिष्ठित नागरिक गेम सिंग राठोड, बुजुर्ग महिला यशोदाबाई राठोड,  गोरसिकवाडीचे मा. विष्णु लालसिंग डुंगावत राठोड, गोरसेना तालुका अध्यक्ष अतुल राठोड, पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस मा. आनंद भालेराव, पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा. आशिष शेळके, पत्रकार सेवा संघाचे मा. प्रणय कोवे आणि रमेश परचाके, जमीयते उलेमाचे माहूर अध्यक्ष मौलाना सनाउल्ला खान, जमात-ए-इस्लामी हिंदचे डाॅ. मुखीत, टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संघटक फयाज पठाण, धर्माबाद तालुका अध्यक्ष खुर्रम बेग पटेल, तालुका उपाध्यक्ष इब्राहिम बेग पटेल, तालुका सचिव सय्यद शाहिद अली, उमरी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, मुदखेड तालुका अध्यक्ष मुजीब अहमद, इ. ची उपस्थिती होती.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, विष्णु राठोड, सुभाष राठोड, शेख अजमल, शेख ज़ुबेर, साहिल खान, शेख मुनव्वर, शेख शकील, शेख सोनू, सय्यद अलीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.