Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त लोहा येथे गौरव सोहळा संपन्न


लोहा, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लोहा तालुका नेहमीच समाजहिताचे कार्य हाती घेत उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा गौरव करत असल्याचे दिसून येते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोहा येथे नुकताच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मान्यवरांचा गौरव सोहळा संपन्न झाला. लोहा शहरात ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यादिवशी जन्मदिन असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातून व पत्रकारितेतून समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समिती सदस्य युवा सेना जिल्हा समन्वयक नवनाथ उर्फ बापू रोहिदासजी चव्हाण यांचा जन्मदिनानिमित्त व त्यांनी केलेल्या एकंदरीत केलेल्या विधायक कार्याचा आढावा घेऊन त्यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नांदेड जिल्ह्यातील व लोहा मतदार संघातील एकमेव युवा नेतृत्व ज्यांनी गत पाच वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील पाणी टंचाई, सर्वसामान्यांच्या समस्यांची अतिशय काळजीपूर्वक सोडवणूक केली. त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने गौरव सोहळा आयोजित केला होता. पत्रकार मोहन पवार व विलास सावळे या दोन्ही पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

 पत्रकार विलास सावळे यांना नुकताच समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच पत्रकार मोहन पवार यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन जन्मदिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उत्तम महाबळे उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव प्रा.मारोती चव्हाण, सहसचिव तुकाराम दाढेल, कोषाध्यक्ष रमेश पवार, सहकोषाध्यक्ष संतोष तोंडारे, प्रसिद्धीप्रमुख शिवराज दाढेल यांसह प्रमुख पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत ०१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण, लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष केशवराव (मुकदम) चव्‍हाण, समाज भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार विलास सावळे, निर्भीड निपक्षपाती पत्रकार मोहन पवार यांचा  गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...