Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

प्रा. वंदना तामगाडगे यांच्या ' सखी जागी हो ' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन !

किनवट ( प्रतिनिधी ) : कवितेत नवं लिहायचं असतं. अंतकरणाच्या मुशीतून जे येतं ते ज्वलंत काव्य असतं. बेंबीच्या देठापासून जोपर्यंत कालवाकालव होत नाही तोपर्यंत चांगली कविता सापडत नाही. अकारण कवितेच्या नादी लागायचं नाही. वृक्षावर आंबा फळ जेव्हा पाडाला येतो तेव्हा आपोआप देठ सोडून खाली पडतो तसं कवीतेचं असतं. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी केले. गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभाग्रहात प्रा. वंदना तामगाडगे यांच्या 'सखी जागी हो ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. त्या प्रसंगी हडसनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी गीतकार रविचंद्र हडसनकर होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके, बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे, नागसेनदादा सावदेकर आणि गौतम दामोदर यांची प्रमुख उपस्थिती होती.   प्रारंभी राष्ट्रमाता जीजाऊ,  सावित्रीबाई फ

सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक देविदास हरीदास वंजारे यांची काव्य रचना सज्जन साकार जरूर वाचा

 🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦 🔵विषय:-ऐच्छिक काव्यरचना🔵 ==================== 🟡शीर्षक:-सज्जन साकार🟡 🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦 नसावा मनात | अहो अहंकार | सगुण साकार | जीवनात || होईल बंधूनो | आनंदी जीवन | मन ते पावन | सकलांचे || क्षणीक आयुष्य | घडवा भविष्य | गोड करा भाष्य | आपसात || भरोसा नाही रे | आता जीवनाचा | संघर्ष मनाचा | नीट वाग || नातलग जाण | मोठ्यांना दे मान | नको अपमान | करू आता || मदत करावी | ती  एकमेकांना | साथ अनेकांना | आनंदात || प्रेम भरा मनी | विसरा अबोला | प्रेमानेच तोला | सर्वजण || धरू नये राग | धगधग आग | असू द्यावी जाग | सर्वजना || भयंकर क्रोध | घ्या सत्याचा शोध | दुष्टांचा तो रोध | करा आता || द्यावा मानपान | सत्याचा आकार | सज्जन साकार | करावेत || 🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦 ✍️देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड✍️ 🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦

मनातील भाव विश्व... म्हणजे "व्यक्त अव्यक्त" जनक जगदीश कुलकर्णी यांचा काव्य संग्रहावर सुप्रसिद्ध लेखीका ज्योती गायकवाड यांचा वाचनीय समिक्षण जरूर वाचा टाईम्स ऑफ महाराष्ट्र पोर्टल वर

 ▪️▫️▪️ मनातील भाव विश्व... म्हणजे "व्यक्त अव्यक्त कवी जनक कुलकर्णी यांचा व्यक्त-अव्यक्त हा कवितासंग्रह हाती आला आणि वाचून आनंद झाला कवी हा काव्यसंग्रह साहित्य विश्वात साहित्य यशाची पहिली पायरी असून या काव्यसंग्रहात ते मनमोकळेपणाने अभिव्यक्त झाले आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजात वावरताना आपण समाजाचे काही देने लागतो त्याअनुषंगाने ते ऋण न फिटणारे असतात मग समाजातील अशा अनेक गोष्टींशी त्यांचा निकटचा संबंध येतो आपल्या समोर घडणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडामोडींचा आढावा घेतो. आयुष्य जगताना सभोवतालच्या घडामोडीवर मनुष्य हा घडत असतो आणि त्याच घडवनितून जेव्हा तो घडत असतो जगत असतो तेव्हा त्याच्या समोर अनेक आव्हाने तसेच अडचणींचा ही प्रसंग येतो मग त्या अडचणीवर मात करून प्रहार करताना कवी कधी व्यक्त होणाऱ्या तर कधी अव्यक्त प्रश्नांची उत्तरे शोधतो जीवनाच्या शोधात निघालेला कवी प्रगल्भ होताना दिसतो उमलत्या अवस्थेत प्रेमाच्या वाटेवर येऊन थांबतो आणि आपल्या मनातील प्रेमाचे तराने गात व्याकुळ अवस्थेतून इतर सामाजिक बाबींचा आढावा घेतात. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी विचार क

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित. विविध देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा

  मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१-२०२२ या  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल श्री शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर श्री वलशन वेथोडी ( श्रीलंका) श्री ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), श्री क्रिस हाँग( कोरिया), श्री ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), श्री परेश मेहता, श्री सतीनंदर आहुजा (जॉर्जिया झाकिया वर्डक( अफगाणिस्तान), श्री प्रवीण लुंकड, श्री जे के चतुर्वेदी, श्री उदय नाईक, उद्योजक श्री विठ्ठल कामत, श्री एकनाथ तांबवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्

सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्याते प्रा. दगडु भरकड यांचा शिव जंयती निमित्त विशेष लेख

 जय जिजाऊ ..जय शिवराय.. कुळवाडी भूषण , रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .👏👏💐💐 अठरा पगड जातीतील व मुस्लीम  मावळ्यांना सोबत घेऊन बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी , समतेसाठी ,न्यायासाठी ,मानवतावादी विचारांने स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवरायांचे गुरु राजमाता जिजाऊ व वारकरी संप्रदायातील विज्ञानवादी संत तुकाराम महाराज होते .मुघलशाही ,आदिलशाही ,कुतुबशाही ,बरिदशाही ,निजामशाही ,इंग्रज ,फ्रेंच ,डच , पोर्तुगीज यांच्या व प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेच्या सर्व प्रकारच्या शोषणातून ,गुलामगिरीतून ,गोर-गरीब ,शेतकरी ,कष्टकरी , स्ञियांना मुक्त करण्यासाठी , न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्याचे आंदोलन उभारले  .त्यांचा लढा कोणत्याही जाती ,धर्माच्या विरोधात नव्होता तर तो मानवजातीच्या कल्याणासाठी होता . आपली रोजगार हमी योजना पिढ्यांपिढ्या चालावी .सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,धार्मिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात आपलीच मक्तेदारी असावी .यासाठी आपल्या सोईचा इतिहास लिहिला . राईचा पर्वत केला आणि पर्वताची राई केली .मध्ययुगीन कालखंडात सर्वच राज्यकर्त्यांसोबत ब्राम्हण हो

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड 2021ने सन्मानित

  किनवट/प्रतिनिधी: आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड 2021ने सन्मानित करण्यात आले   बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये 12 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शानदार अवार्ड 2021 च्या कार्यक्रमात किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले  यांना बॉलिवूड लीजेंड अवार्ड 2021 ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.     त्यामुळे नासिर तगाले यांच्यावर चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    या कार्यक्रमात संगीतकार अनु मलिक, आमदार भारती लव्हेकर, दीपा नारायण झा, एहसान कुरैशी, रज़ा मुराद, अरुण बख्शी, ऋतु पाठक अशा अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले

नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे तर, कार्याध्यक्षपदी मिलिंद सर्पे यांची बिनविरोध निवड

  नांदेड,दि.१७ :  नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे यांची,तर कार्याध्यक्षपदी पत्रकार मिलिंद सर्पे(किनवट) यांची एकमताने निवड करण्यात आली.     जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांची विस्तारित बैठक नांदेड येथे नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली. बिनविरोध निवडलेले संघटनेचे अन्य पदाधिकारी असे ; उपाध्यक्ष - डी. वाय.मिसाळ, गंगाधर जाधव, साईनाथ शिंदे  पाटील, माधव आठवले व रमाताई तिवारी, सरचिटणीस - राजाभाऊ कुलकर्णी, चिटणीस - विजय रावळे,शिवहर हिगमिरे,संदीप सरोदे व शिवाजी वाघमारॆ, संघटक - अभय मोरे, मारोती हनवंते,शेख लतीफ सलमान, प्रताप गजभारे व श्याम वाघमारे, कोषाअध्यक्ष - जगदेव पुयड,सदस्य - जयराम गोडबोले, अशोक जोंधळे, शिवाजी इंगोले, पांडुरंग शेजुळे,प्रभु तारु,पी,डी. मस्के, अजय तिवारी,उत्तम पावडे,डी.एच.गबाळे,राहुल मगरे व धनंजय माजंरमकर,मुख्यसल्लागार - अरुण दादा कांबळे, नाना पाटील क्षिरसागर,व्यंकटराव ठोके,पाडुंरग गोडबोले.  मार्गदर्शक - दादाराव भुक्तरे व धर्माजी सावते.       बैठकिस श्री. नवरे, जैतापूरकर, व्यंकटेश चन्नावार,आश्विन.बट्टु, बालाजी भोकरे,स्व

किनवट येथील जेतवन विहार येथे रमाई जंयती साजरी

  किनवट शहर बातमीदार:- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस कांताताई मिलिंद सर्पे यांनी बुद्ध वंदना घेतली व त्या नंतर रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माघ पौणिमा निमित्त बबन सर्पे यांच्या कडुन खीर व अल्पोपहार देण्यात आला. या वेळी विशाखा महिला मंडळाच्या सारजाबाई कावळे , रंजना सर्पे, सुधाबाई परेकार, विठाबाई कावळे, राहीबाई पाटील, सोमीत्राबाई कावळे, विजयमाला आळणे,कचरूबाई मुनेश्वर, सुशिला ठमके, जयमाला आळणे, सिंधुबाई कांबळे, सारजा कावळे,राहीबाई पाटील, लक्ष्मी पाटील, दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, सुजाता भरणे, रामबाई , ज्योती कावळे, पुजा सर्पे, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, सागर नगारे, जयमाला नगारे, रुपाली कावळे, रेखा सर्पे, शेशीकला कावळे, आम्रपाली कावळे, सीमा पाटील, इंद्राबाई ठमके, मैनाबाई पाटील, कमलबाई भरणे, प्रतिक्षा ठमके, ज्योती सर्पे, शितल घुले, वंदना भवरे, द्वारकाबाई घुले, यांची व बाल बा

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कराल तर खबरदार - डी. टी. आंबेगावे

  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, संघाचे पदाधिकारी नितीन हांडे, सौ. मेघा पाटील, प्रतिक्षा पिटले, निकिता पिटलवार, सूरज मद्देवाड, विवेक मुळजे, फिरोज मुजावर येजाज पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही. पत्रकारांवर कोणी खोटे गुन्हे दाखल करीत असाल तर खबरदार असा इशारा दिला आहे. तसेच पत्रकारांच्या संदर्भात विनाकारण कोणी अपशब्द उच्चारत असेल किंवा धमकी देत असेल तर कदापिही त्यांना माफ केले जाणार नाही असा विश्वास

सोवार्थ फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक संध्या उपक्रम

किनवट ता. प्र.  नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील आदिवासी भागातील घोटी या गावी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या या नावाने  दर रविवारी उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमध्ये विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळ स्पर्धा या प्रकारचे वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन करत आहे.हा उपक्रम  5 वी ते 12 पर्यंत सर्व विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात येत असून या रविवारी विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेस मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर व सेवार्थ फाऊंडेशन चे ऋषिकेश लढे,  तसेच गावातील काही तरुण हा उपक्रम राबविण्यासाठी मदत करत असलेले  प्रसेनजित कायपक, अनिकेत कायापक, रंजीत पाटील, नरेश गिमेकार, धममदिप तामगाडगे, रंजीत पाटील, अमन शेख, आशिष शेंडे इ. त्या दरम्यान उपस्थित होते...

तिसरी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत किनवटच्या शोटोकॉन कराटे असोसिएशनचे विद्यार्थी चमकले

  ✍🏽राजेश पाटील किनवट बातमीदार:- तिसऱ्या महाराष्ट्र  राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथे झाल्या या स्पर्धेत किनवट येथील शोटोकॉन डो असोसिएशनचे विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक संदीप  प्रल्हाद यशिमोड व  प्रशिक्षक रितेश जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली आपले कसब लावुन कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी  किनवट तालुक्याचे  नाव लौकिक केले या कराटे स्पर्धेचे आयोजन ब्रुस ली यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरवात करण्यात आली. मध्ये वजनी गटा नुसार मेडल देण्यात आले ते खालील प्रमाणे आहेत. १) रुचीका कटारे वजन गट ४५ ते५० प्रथम क्रमांक  २) शिवानी सोनवणे वजन गट ४१ ते४५ प्रथम क्रमांक ३) ऋतुंबरा वाटकाड वजन गट४५ ते५० तृतीय क्रमांक ४) ईश्वरी जमदाडे वजन गट २५ ते२० द्वितीय क्रमांक ५) संस्कृती मेश्राम वजन गट ४१ ते४५ प्रथम क्रमांक ६) मनीष कालावर वजन गट ४१ त ४५ द्वितीय क्रमांक ७) ऋषी बोदडवर वजन गट  ४५ ते ५० प्रथम क्रमांक ८) निल अंबर ठमके १५ ते२० वजन गट द्वितीय क्रमांक ९) आर्यन ओंकार वजन गट३० ते ३५ द्वितीय क्रमांक अशा प्रकारे कराटे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन कर

ए आय एम आय एम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅ. असुद्दोदिन अवैसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा किनवट येथे निषेध

  ता. प्र. किनवट / सय्यद नदीम:- उत्तर प्रदेशातील छिजारसी येथे AIMIM पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरीस्टर असुद्दोदीन अवैसी हे प्रचार सभेस जात असतांना तेथील अज्ञात समाज कंटक लोकांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. ह्या भ्याड हल्याचा जाहिर निषेध किनवट येथील AIMIM या पक्षातर्फे निषेध करण्यात आला व उपजिल्हाधिकारी कार्यालया मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना हे निवेदन देण्यात आले तसेच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली गेली या निवेदनावर काझी शफीयोद्दीन काझी करीमोद्दीन  तालुका अध्यक्ष ,सरदार काज़ी ,शेख फहीम ,शेख अतीक ,सोहेब रहेमान,शेख फय्याज,अकरम खान,शेख फ़ारूक़,शेख आरिफ,राजू सड़के,शेख रुखसत,शेख अली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रकारांवर हल्ला केल्यास माफ करणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

   महाड (रायगड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे  यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकण विभाग योगेश भामरे व कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार यांच्या उपस्थितीत महाड तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाड तालुकाध्यक्षपदी किशोर किर्वे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महाड तालुका सचिव स्वप्नील ढवण, सहसचिव श्रीकांत गायकवाड, महाड तालुका कार्याध्यक्ष इस्माईल मापकर, तालुका खजिनदार रेश्मा माने, तालुका संघटक संदेश चौधरी, तालुका सहसंघटक राकेश देशमुख, तालुका सदस्य प्रतिक पलंगे, यांच्यासह पत्रकार विवेक चाफेकर व अभिजीत ढाणीपकर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित महाड तालुकाध्यक्ष किशोर किर्वे म्हणाले की,  पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्र

सुनिल गरड पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

  किनवट प्रतिनिधी:- हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी तथा निकटवर्तीय सुनिल गरड पाटील यांचा वाढदिवस उत्साहात व साधेपणाने साजरा करण्यात आला . गोदावरी अर्बन बँकेच्या खालील खासदाराचे कार्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांच्या प्रेमळ व बोलक्या स्वभावामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. या प्रसंगी विशाल गिमेकर, सतीश कऱ्हाळे पाटील, राजेश पाटील, सय्यद नदीम, विजय जोशी, संतोष मरसकोल्हे, किरण ठाकरे, धनराज पेंदोर, व्यंकट भंडारवार , बालाजी बामने ,प्रशांत कोरडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगाव तालुक्याची महिला कार्यकारिणी जाहीर

  नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगावची महिला कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  दक्षिण नांदेडच्या महिला जिल्हाध्यक्षपदी रुपादेवी पाटील तर हदगाव तालुका महिला अध्यक्षपदी पूजा राऊत यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने महिलाच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करुन नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्ती पत्राचा कार्यक्रम आज दिनांक १ जानेवारी,२०२२ रोजी जुने तहसील कार्यालय समोर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्यालय हदगाव येथे पार पडला. यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी, हदगाव तालुकाध्यक्ष कैलास तलवारे आणि नवनिर्वाचित महिला जिल्हाध्यक्षा रुपादेवी पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघाचे महिला तालुका अध्यक्षा पूजा राऊत, तर महिला उपाध्यक्षा सुभद्रा खंदारे आदी महिलांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार, हदगाव तालुका पदाधिकारी सिद्धार्थ वाठोरे, तुषार कां