ए आय एम आय एम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅ. असुद्दोदिन अवैसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा किनवट येथे निषेध
ता. प्र. किनवट / सय्यद नदीम:-
उत्तर प्रदेशातील छिजारसी येथे AIMIM पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरीस्टर असुद्दोदीन अवैसी हे प्रचार सभेस जात असतांना तेथील अज्ञात समाज कंटक लोकांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे.
ह्या भ्याड हल्याचा जाहिर निषेध किनवट येथील AIMIM या पक्षातर्फे निषेध करण्यात आला व उपजिल्हाधिकारी कार्यालया मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना हे निवेदन देण्यात आले तसेच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली गेली या निवेदनावर काझी शफीयोद्दीन काझी करीमोद्दीन तालुका अध्यक्ष ,सरदार काज़ी ,शेख फहीम ,शेख अतीक ,सोहेब रहेमान,शेख फय्याज,अकरम खान,शेख फ़ारूक़,शेख आरिफ,राजू सड़के,शेख रुखसत,शेख अली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment