Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित. विविध देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा

 


मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१-२०२२ या  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल श्री शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर श्री वलशन वेथोडी ( श्रीलंका) श्री ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), श्री क्रिस हाँग( कोरिया), श्री ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), श्री परेश मेहता, श्री सतीनंदर आहुजा (जॉर्जिया झाकिया वर्डक( अफगाणिस्तान), श्री प्रवीण लुंकड, श्री जे के चतुर्वेदी, श्री उदय नाईक, उद्योजक श्री विठ्ठल कामत, श्री एकनाथ तांबवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसिद्ध उद्योग जक श्री विठ्ठल कामत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मुंबईचे डायरेक्टर जनरल श्री संदीप खोसला, प्रसिद्ध ढोलकिवादक श्री विजय चव्हाण,  सोमय्या कॉलेज,मुंबईचे प्राचार्य डॉ. एस के उकरांडे, शास्त्रज्ञ श्री हेमंत रोहेरा, शिपिंग विभागाचे श्री शब्बीर रंगवाला, आंतरराष्ट्रीय वाणिज्य व व्यापाराच्या तरुण प्रचारक श्री मनप्रितसिंग नागी, प्रसिद्ध महिला तबला वादक श्रीमती अनुराधा पाल, आर्किटेक्चर व्यावसायिक श्री प्रेम नाथ आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याचे उत्कृष्ट प्रास्ताविक व निवेदन डॉ. संजय भिडे यांनी केले. याप्रसंगी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेचे व्ही आय पी पदाधिकारी व  सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते