Skip to main content

पत्रकारांवर हल्ला केल्यास माफ करणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

 


 महाड (रायगड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे  यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकण विभाग योगेश भामरे व कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार यांच्या उपस्थितीत महाड तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली.



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाड तालुकाध्यक्षपदी किशोर किर्वे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महाड तालुका सचिव स्वप्नील ढवण, सहसचिव श्रीकांत गायकवाड, महाड तालुका कार्याध्यक्ष इस्माईल मापकर, तालुका खजिनदार रेश्मा माने, तालुका संघटक संदेश चौधरी, तालुका सहसंघटक राकेश देशमुख, तालुका सदस्य प्रतिक पलंगे, यांच्यासह पत्रकार विवेक चाफेकर व अभिजीत ढाणीपकर उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित महाड तालुकाध्यक्ष किशोर किर्वे म्हणाले की,  पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे, आपल्या लेखणीचा योग्य वापर करून गोरगरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहावे. कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाड तालुका पदाधिकाऱ्यांचे राज्य पदाधिकारी, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, संघटक संजय लांडगे, कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा जनसंपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर,जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...