Skip to main content

मनातील भाव विश्व... म्हणजे "व्यक्त अव्यक्त" जनक जगदीश कुलकर्णी यांचा काव्य संग्रहावर सुप्रसिद्ध लेखीका ज्योती गायकवाड यांचा वाचनीय समिक्षण जरूर वाचा टाईम्स ऑफ महाराष्ट्र पोर्टल वर

 ▪️▫️▪️


मनातील भाव विश्व... म्हणजे "व्यक्त अव्यक्त


कवी जनक कुलकर्णी यांचा व्यक्त-अव्यक्त हा कवितासंग्रह हाती आला आणि वाचून आनंद झाला कवी हा काव्यसंग्रह साहित्य विश्वात साहित्य यशाची पहिली पायरी असून या काव्यसंग्रहात ते मनमोकळेपणाने अभिव्यक्त झाले आहेत.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजात वावरताना आपण समाजाचे काही देने लागतो त्याअनुषंगाने ते ऋण न फिटणारे असतात मग समाजातील अशा अनेक गोष्टींशी त्यांचा निकटचा संबंध येतो आपल्या समोर घडणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडामोडींचा आढावा घेतो. आयुष्य जगताना सभोवतालच्या घडामोडीवर मनुष्य हा घडत असतो आणि त्याच घडवनितून जेव्हा तो घडत असतो जगत असतो तेव्हा त्याच्या समोर अनेक आव्हाने तसेच अडचणींचा ही प्रसंग येतो मग त्या अडचणीवर मात करून प्रहार करताना कवी कधी व्यक्त होणाऱ्या तर कधी अव्यक्त प्रश्नांची उत्तरे शोधतो जीवनाच्या शोधात निघालेला कवी प्रगल्भ होताना दिसतो उमलत्या अवस्थेत प्रेमाच्या वाटेवर येऊन थांबतो आणि आपल्या मनातील प्रेमाचे तराने गात व्याकुळ अवस्थेतून इतर सामाजिक बाबींचा आढावा घेतात.

या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी विचार करायला लावणारे रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट हे उत्कृष्ट बांधणीचे असून हा काव्यसंग्रह लक्षवेधी झाला आहे हा संग्रह म्हणजे

काव्यसंग्रहाला समर्पित अशा बोलक्यारेशा रेखाटल्या आहेत सुंदरसे वृक्ष आणि वृक्षाखाली विचारांमध्ये रममाण झालेला व्यक्त अव्यक्त भावनांचा शोध घेण्यासाठी एकांतात हरवलेला युवक कवी प्रगल्भतेने विचारावर संशोधन करताना दिसून येत आहे. मनातील उत्कट भावनांचा तो आविष्कार करतो आहे. कधी स्वतःच्या शोधात तर कधी माणसांच्या प्रगतीच्या शोधात निघालेला कवी स्वतःला हरवून घेताना यामध्ये खोलवर जाऊन उणिवांचा शोध घेतो आहे.



 हा संग्रह म्हणजे मुक्तचिंतन होय यामध्ये भाषा सहज साधी सोपी असली तरी प्रभावी ठरली आहे.

या काव्यसंग्रहात सुरुवातीला प्राध्यापक धाराशिव शिराळे यांची प्रस्तावना असून अगदी कवीला आणि वाचकांना ऊर्जा देणारी प्रस्तावना आहे त्यांच्या प्रस्तावनेने कवी जनक यांना मोठी प्रेरणा मिळणारी आहे  आहे या काव्यसंग्रहात एकूण 61 कविता असून प्रत्येक कवितेत कवी मनाची घालमेल व्याकुळता आणि अस्वस्थता वेळ प्रसंगी खंबीरता दिसून येत आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मनात असलेली जिद्द या कवी मध्ये दिसते आहे.

या काव्यसंग्रहाचे मलपृष्ठ म्हणजेच म्हणजेच प्रसिद्ध कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी विठ्ठल यांनी कवितांचा आढावा घेऊन मलपृष्ठ लिहिले आहे काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. साहित्यविश्वात कुसुमाग्रजांच्या ओळी प्रमाणे पाठीवरती हात ठेवूनी सर फक्त लढ म्हणा अशी ही पाठराखण ठरली आहे. आईच्या उदरातून जन्म घेऊन या जगत विश्वात पहिलं पाऊल टाकताना आणि बघता बघता सर्व विश्व व्यापून आईच्या आशीर्वाद रूपाने तो जग जिंकतो अशाप्रकारे पी विठ्ठल सरांच्या हाताला नाही तर बोटाला धरून चालणे होय म्हणजेच या साहित्याच्या वाटेवरचा प्रवास कवी जनक यांच्या साठी प्रेरणादायी ठरणार आहे नवोदित युवा कवी जनक कुलकर्णी हे शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी मनामध्ये ध्येय घेऊन जिद्दीने प्रवासाला निघाले आहेत मातीसह मातीचे ऋण फिटणार नाहीत असे अनेक स्त्रोत या काव्यात सुंदरतेने सजविले आहेत या उमद्या मनाच्या कवीचा ,जेव्हा काळजाचा कप्पा उघडत जातो तशी एक एक कविता काळजातून वाहताना दिसते.

आणि मग जेव्हा आपण  कवितेला वाचतो तेव्हा आपसूकच आपल्या मनावर भावभावनांचे तरंग उमटत जातात इतक्या सुंदर सहज सोप्या रचना मनाचं ओझं हलकं करणाऱ्या आहेत विविध रंगाने सजलेल्या विविध रूपाने सजलेल्या कविता पुस्तकातून आपल्या भेटीला आलेल्या आहेत

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नांदेडचे संजय सुरनर यांनी कवीच्या मनातील बोलक्या भावना रीतसर आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. नक्कीच सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारा हा काव्यसंग्रह आहे.


या काव्यसंग्रहात अनेक रचना मनाला स्पर्श करून जातात

"व्यक्त  अव्यक्त" या काव्यसंग्रहात जनक  या नवोदित कवीने शब्दांच्या मुळाशी जाऊन आत्मीयतेने एक एक शब्द पेलला आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेत आणि शब्दाशब्दात प्रामाणिकता दिसून येते आहे.  प्रत्येक कवितेत त्यांनी स्वतःला नजरेसमोर ठेवून स्वतःला सिद्ध केले आहे की कविमनाचा माणूस किती प्रांजळ निर्मळ निखळ आणि किती स्वच्छ असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. कवी कधीकधी कर्त्या बापाचा मुलगा होऊन बापाची खरी ओळख करून देतात तर कधी आई विषयी आईचे महत्व आणि ममत्व पटवून सांगतात आईची महती समजावून सांगताना कवी आईच्या मनाची कथा आणि व्यथा  मांडताना दिसून येतात भगवंताला साक्षी ठेवून कवितेची सुरुवात करताना कवीने श्रद्धा असणाऱ्या त्या भगवंताला म्हटले आहे आदि तू  अनादि तू अंत ही तू

सर्वस्व मानणाऱ्या त्या भगवंताविषयी कवीने सुंदर शब्दात आपल्या काव्य रचनेला गुंफण केली आहे

"व्यक्त अव्यक्त" या काव्यसंग्रहात कवी  हे कधी प्रियकर होऊन प्रेयसीचे वर्णन करताना म्हणतात की, 

मन हे खुळे झाले वेडेपिसे

तुझ्या सौंदर्याला मोहले असे 

त्यानंतर कवी कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मनामध्ये जिद्द असावी, ध्येयाची आठवण करून देणारी, मनाला उमेद देणारी जिद्द ही कविता ठेवतात.

छंद काव्यनिर्मितीचा हा निराळा असतो या काव्यातून व्यक्त होतो म्हणत, छंदाची जोपासना करताना दिसून येतात.

मृत्यू बाबतही कवीने सत्यता दर्शविली आहे. त्याचबरोबर मित्र म्हणजे कोण असे याचे वर्णन करताना कवी म्हणतात की, मित्रांचे मित्रत्व, शब्दात होत नाही व्यक्त साथीने ज्यांच्या आयुष्याला येते पूर्णत्व. कवी साथ देण्याची अपेक्षा करतात तेव्हा ... म्हणतात की,

तू चिमणी चा दिवा होऊनी 

त्या अंधकारातून निघण्याची वाट दे तू मला साथ दे.

जीवनाविषयी महत्त्व पटवून सांगताना...

कवी म्हणतात की, जीवनात मिळणाऱ्या प्रत्येकाला हसत मुखाने अभिवादन करायचे मला स्वतःवर विश्वास ठेवून हे सुंदर जीवन जगायचे मला.

आत्मविश्वास सांगणारी ही रचना प्रेरणादायी ठरते आहे. त्यानंतर कवी स्त्रीचे महत्व समजावून सांगताना म्हणतात की, स्त्री ही कमलदलासम कोमल ही आहे.

तर गरज भासता रणरागिनी आहे ती

नव्या युगाची  सतिसावित्री ती.


स्त्रीची ओळख करून दाखवणारी ही रचना  मनामध्ये उस्फूर्तता जागविणारी आहे. 

मुखवटे या कवितेत कवी जनक यांनी रंग बदलणारे मुखवटे कसे असतात असे म्हणत स्वतःची खरी ओळख लपवून माणूस रोज चढवतो नवा मुखवटा अशी खंत व्यक्त करताना कवी मनाची घालमेल होते आहे.

कवी आपल्या शेतकरी या कवितेत रणरणत्या उन्हात राबणाऱ्या बापाची व्यथा मांडताना म्हणतात की,

रणरणत्या उन्हात तो घाम गाळतोय

दिवस रात्र राबुनि तो जग जगवतो

स्वतःचा शोध घेण्यात मग्न झालेले कवी म्हणतात की, आता स्वतःच्या शोधात निघालोय मी

लोकांचा विचार न करता स्वतः स्वतःचे ऐकतोय मी

स्वतःच्या विचारांवर ठाम राहायला शिकता आलं पाहिजे

या रचनेतून स्वबळावर काहीतरी केलं पाहिजे. असे सांगतात.

प्रेम पावसात बेधुंद होताना

कवी प्रेम कसं करावं

ध्रुवताऱ्यावर त्याच्या स्वस्थानी ठाम राहण्यावर कवितेत हरवल्यावर असेही एकदा व्हावे म्हणत, कल्पनेच्या दुनियेत हरवून पुन्हा बालपण यावे, असेही एकदा व्हावे 

बालपणात किती मोठा आनंद असतो हे सांगतात.

कवी पुढे आपल्या कवितेत म्हणतात, ठरवून होत नाही कवी कवितेला नाहीतर कविता कविला जन्म देते.

यामध्ये कवीला मार्मिक अर्थ सापडलेला आहे. कवी जनक त्यांच्या मनाला अस्वस्थेने व्यापून सांगतात की, शोधूनही पहिल्यासारखं काही सापडत नाही. राहिलं काय पहिल्यासारखं

मैदानात मनसोक्त कुणीही बागडत नाही.

ही खंत व्यक्त करताना कवी म्हणतात आता शोधूनही काही सापडत नाही.

सुखाची व्याख्या सांगताना कवि म्हणतात की, ज्याला खळखळून हसता येतं मनमुराद जगता येतं ते म्हणजे सुख असतं. सुखाची व्याख्या सकारात्मकतेने करून सुखामध्ये अजूनच भर घातली आहे. पुढे कवी म्हणतात की, चुकलेच माझे

विश्वासाचा विश्वासघात होतो तेव्हा आपसूकच शब्द बाहेर येतात चुकलेच माझे.

माणूस प्रगती करतोय असे सांगताना कवी  म्हणतो की, आता तर माणूसच मारतोय स्वतःच्या क्षणिक सुखासाठी पण तुम्ही म्हणताय माणूस प्रगती करतोय ..

प्रश्न करणारी कविता आणि माणूस माणसापासून दूर होतोय मग प्रगती कुठे होते खंत व्यक्त करत आहेत. शेवटी कवी अस्वस्थ होऊन काहींनी आनंद दिला तर काहींनी दुःख दिलं म्हणत देण्याघेण्याचा ताळेबंद आपल्या शब्दात व्यक्त करताना कवी येथे  सामंजस्यपणा दाखवतात. कवी जनक कुलकर्णी हे संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांच्या शब्दात माधुर्य आहे, सौम्यता आहे. आणि जे मनात वाटलं, जे सुचलं ते त्यांनी मनातलं ओठांवर आणत यशाची पहिली पायरी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ही त्यांची साहित्य विश्वात यशाची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही. ज्यांच्या लिखाणात प्रामाणिकता आहेत त्यांच्या लिखाणाला सुद्धा न्याय मिळतो, याची मला शाश्वती आहे. असेच त्यांच्या साहित्य रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात होवो, याच मनापासून सदिच्छा...!


ज्योती गायकवाड, नांदेड

8605391171

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला