Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

शेती खरेदी-विक्री मध्ये असणारे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदे।। या कायद्यांचे महत्व, अटी, शर्ती याबद्दल माहिती भाग 6

   किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो शेती ही प्रत्येकाला हवी असते किंवा शेतीच्या विक्रीद्वारे आपण आपल्या जे काही  निकडीच्या गरजा आहेत त्या आपण आपली शेती विकून भागवत असतो मित्रांनो आपल्याला कायदे माहीत असणे गरजेचे याच्यासाठी आहे, यासाठी आहे की भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला कायदा माहित असतो असतो हे गृहीत तत्त्व आहे म्हणून मित्रांनो या ग्रह इ तत्त्वाचा आपण बळीपडू नये याची तंतोतंत काळजी न्यायव्यवस्था घेतच असते परंतु मित्रांनो तोपर्यंत आपला आपल्या जीवनातील काही तोटा होऊ नये यासाठीच आजचा लेख हा माझ्या शेतकरी वर्गाला तसेच शेतमजूर वर्गाला तसेच आमच्या नोकरदार वर्गाला समर्पित करत असताना त्यांच्या कायदेविषयक, नियम विषयक ज्ञानात भर पडावी या उद्देशानेच आजचा लेख मी तुम्हा सर्वांच्या समोर समर्पित फार महत्त्वाच्या उद्देशाने करत आहो तो उद्देश साध्य झाल्यास लेखक हा या सध्याचा शतशः ऋणी राहील हे मात्र खरे आहे.बऱ्याच   शेतकरी मित्रांच्या शेतजमिनीमध्ये विहीर खोदल्यानांतर पाणी लागत नाही मात्र दुसरा शेतकरी असतो ज्याच्या शेतजमिनीलगत धरण,नदी, किंवा पाण्याचा स्रोत असतो तर त्याच

शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घ्यावी याबद्दलची सर्वांसाठी महत्वाची माहिती जाणून घ्या कायद्याची माहिती भाग 5

  किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी/ भांडवलदार/ नोकरदार/ कष्टकरी कामगार/ शेतमजूर मित्रांनो शेत जमीन खरेदी करणे हे प्रत्येकालाच आवडत असते किंबहुना तर ते कुटुंबाचे /व्यक्तीचे ते स्वप्न असते किंबहुना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही फार महत्त्वाची समजली जाते म्हणून  मित्रहो प्रत्येक व्यक्ती हा शेतजमीन विकत घेत असतो किंबहुना आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या दशकामध्ये जमिनी हस्तांतरण फार मोठ्या प्रमाणात होत आहे मूळ शेतकरी हा त्यांच्या जमिनी इतर भांडवलदारांना किंबहुना शेतकऱ्याला विकत आहेत जे कष्टकरी आहेत ते लोक शेत जमिनी विकत घेत आहेत. परंतु सावधान शेतकरी मित्रांनो जमीन विकत घेत असताना बरेच काही कायदेशीर बाबी आहेत बरेच काही किचकट प्रक्रिया आहे बरेच काही अनाकलनीय गोष्टी आहेत ज्या आपण या लेखाद्वारे माहिती करून घेणार आहोत... शेतजमीन खरेदी करते वेळी ‌किंवा करण्यापुर्वी कशा पद्धतीने सावधान रहायचं आहे? जेणेकरून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण स्वतः ला वाचवू शकू. कारण शेत जमीन खरेदी-विक्रीचे जे व्यवहार होतात त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण अशा फसवणुकीच्या ज्या

मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे कायद्याची माहिती भाग 4

  किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वात महत्त्वाची तरतूद जी हिंदू कायदा मध्ये आहे ती म्हणजे "मृत्युपत्र" Will या संकल्पने विषयी फार महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची  अशी माहिती पाहणार आहोत मित्रहो आपण या ब्रह्मांडात जन्म घेतो या पृथ्वीतलावर येतो म्हणजे आपण शरीर रुपी व्यक्तिमत्त्व धारण करतो मित्रहो आपल्या जीवनात आपल्याला दोन बाजूची मालमत्ता ही मिळवावी लागते जसे की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला आपल्या आत्म्याची इच्छा असते व तसेच आपल्या पंच्महाभूती शरीराची सुद्धा इच्छा असते मित्रहो आपल्या हिंदू  संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष या आत्म इच्छा असायलाच हव्यात असे सांगितले आहे तर मित्रहो पंचमहाभूती शरीराची इच्छा म्हणजे ऐश्वर्य, धनसंपदा तसेच आनंदमय जीवन व्यतीत करण्याचा प्रत्येक पंचमहाभूती शरीराला तसा अधिकार आहे म्हणून मित्रांनो आपल्या पंचमहाभूती शरीराची जी अंतिम इच्छा असते ती म्हणजे आपल्या मालमत्तेचे कशा प्रकारे विल्हेवाट लावला जावा ती मालमत्ता कशा प्रकारे  ती कोणाकडे हस्तांतरित जावी याचा अगोदरच एखादी व्यक्ती नियोजन करून ठेवते "मृ

मुस्लीमांच्या विविध मागण्यासाठी टिपु सुल्तान ब्रिगेडसह विविध मुस्लीम सामाजिक संघठने तर्फे "एक युवक एक पोस्टकार्ड" मोहीम राबविण्यात आली व मुख्यमंत्र्याना पोस्टकार्ड पाठवण्यात आले

  ✍🏻राजेश पाटील ता. प्र.किनवट:- मुस्लीम आरक्षण व विद्यार्थी हितांच्या प्रश्नासाठी टिपु सुलतान ब्रिगेड व विविध मुस्लिम सामाजिक संघटनेतर्फे एक युवक एक पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली व पोस्टाद्वारे मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे मंत्रालय मुबंईला टपाल पोस्ट पाठवण्यात आले या मोहिमेला अनेकांनी पाठींबा दर्शवीला आहे  यावेळी जिल्हा कार्यकारीणी अध्यक्ष सय्यद नदिम, ता. अध्यक्ष शेख शाक़िर शेख इशरत , तौसीफ खान, शेख रीयाज, यु. ता. अ.शेख समीर, शहबाज खान शहर अध्यक्ष, यासह अनेक युवा उपस्थित होते यात १००च्या वर युवकांनी पोस्ट टपाल द्वारे  मुख्यमंत्री महोदयांना पोस्ट कार्ड पाठवले . खालील मागण्या करण्यात आल्या ▪️१) मुस्लीमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा. ▪️२) मॉब लिंचींग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा. ▪️३) मॉबलिंचींग विरुध्द कायदा तयार करण्यात यावा  ▪️४) प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुलां- मुलिसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे  ▪️५) बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लीम मुला- मुलीनां एम पी एस सी व युपीएससी साठी संस्था स्थापन करण्यात यावी ▪️६) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्य

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली महागाई जिवनावश्यक वस्तु पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन

  ता. प्र.किनवट:- केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामूळे मागील वर्षभरात जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल, डिझेल तसेच बी बियाणे, खतांचे दर गगनाला भिडले आहे.या महागाईत सामन्य वर्ग होरपळून निघत आहे त्यामुळे सरकार च्या या धोरना विरोधात आज किनवट वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तालुका अध्यक्ष किशनराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले या वेळी तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, सचिव राहुल कापसे, मिलींद वाठोरे, सम्राट कावळे, संजय गुरनुले, दया पाटील प्रहार शक्ति संघटनेचे अभय नगराळे, वासाटे, आनंदराव बेंद्रे, विलास भवरे, मारोती भुरके, ऋषीकेश कांबळे, ज्ञानेश्वर खरे, अदित्य भवरे, गंगाधर कदम, जनार्धन भवरे, दत्ता गडलवाड विठ्ठल गडपाळ आदी उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.

बळीराम पाटील महाविद्यालयात रासेयोच्या वतीनेआंतराष्ट्रीय योग दिवस साजरा

किनवट शहर प्रतिनिधी:-  मन व शरीर सुदृढ ढेवण्यासाठी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले.या आजारावर मात करण्यासाठी नियमित योगा करणे हे अत्यावश्यक आहे.विविध आजारापासून रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपण योगाचे महत्त्व जाणून घ्यावे. असे मत बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग शिक्षक देविदास मुनेश्वर यांनी व्यक्त केले.  किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी देविदास मुनेश्वर यांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना देविदास मुनेश्वर यांनी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे आहे.प्राचीन काळापासून योग केले जाते.माणसाला सुख

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील १० हजार ५७४ घरकुलांना मंजूरी

 हिंगोली:- हिंगोली लोकसभा मतदारसंघातील १० हजार ५७४ घरकुलांना मंजूरी देशात सर्वत्र प्रधानमंत्री आवास योजना  राबविण्यात आली मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप त्यांचे निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली होती, केंद्राच्या निधी अभावी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ही योजना रखडली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन मतदार संघातील ६ नगरपालिका व ५ नगरपंचायतीच्या अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी Hardeep Singh Puri  यांची भेट घेऊन मतदार संघासाठी एकूण  १० हजार ५७४ घरकुलांसाठी १५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी ५० कोटी रुपयांचा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यासाठी सर्वाधिक ६ कोटी ६१ लक्ष रुपयाचा सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. यामुळे  सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. हिमायतनगर ६ कोटी ६१ लक्ष, हिंगोली ६ कोटी ४३ लक्ष,  वसमत ४ कोटी १८ लक्ष,  कळमनुरी २ कोटी ४२ लक्ष,  उमरखेड ३ कोटी ८८ लक्ष,   हदगाव ५ कोटी २१ लक

शनीवारपेठ व चिखली दरम्यान पावसामुळे ब्रिज तुटल्याने हजारो लोक फसले

ता. प्र.किनवट: ता.१७ किनवट तालुक्यत आज सरासरी ७.२मी मी इतका पाऊस पडला असुन किनवट तालुक्यातील शनीवार पेठ व चिखली  या गावातील राष्ट्रीय महामार्गासाठी तयार केलेले तीन ते चार पुल वाहुन गेले या मुळे ८००ते १००० लोक पावसात अडकले आहे त्यामुळे या लोकांना सुरक्षित स्थळी आणने व पुलाची दुरुस्ती तात्काळ करुन ये- जा करण्यासाठी पुल उभारावे अशी मागणी रस्त्यात अडकलेल्या लोकांनी केली आहे तहसील प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी करावी व अडकलेल्या लोकांना दिलासा द्यावा    पुढील पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही तसेच रस्त्याची लांबी कमी करुनये १२० फुट करावी अशी मागणी येथील जागरुक नागरीक करीत आहेत . व्हिडीओ.... सौजन्य नागभुषण येंबररवार

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते ओम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

हिमायतनगर/ नांदेड  : हिमायतनगर   तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत  ग्रामीण भागातील पहिल्या वहिल्या ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर  यापुढे खूप मोलाची  जबाबदारी आहे अशी भावना खासदार हेमंत पाटील यांनी ओम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची च्या उदघाटन प्रसंगी केली.यावेळी त्यांनी  हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.         हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर  तालुका हा अतिग्रामीण भाग  असलेला तालुका असून नांदेड पासून जवळपास १०० किमी अंतरावर आहे अशा वेळी या परिसरातील नागरिकांना  त्यांच्या भागात आरोग्याच्या उत्तम आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात याकरिता  मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची गरज होती.यामुळेच इथून पुढे ओम हॉस्पिटल ची जबाबदारी वाढणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.यामुळे हिमायतनगर सह आजूबाजूच्या तालुक्यातील  गरजूंना  सुद्धा मोठा आधार झाला आहे,याच बरोबर सर्व सामान्यांचा  मानसिक आणि आर्थिक त्रास आणि  वाचणार आहे असे अशा शब्दात त्यांनी हॉस्पिटल चा गौरव केला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विश्वंभरअण्णा मादासवार,नगराध्यक्ष कुणाल राठोड,माजी जि.पं.सदस्य ढोले बापू,बारडचे उपसरपंच बाळासाहे

किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी रस्ता होणार जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केराम प्रत्यक्षात उतरवणार

  किनवट तालुका प्रतिनिधी:- स्वातंत्र्यपुर्व काळापासून मागणी असलेला किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी या गावांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता बांधकामाला मूर्तरूप देण्यासाठी जनतेच्या मागणीचा सलग पाठपुरावा करत या रस्त्याची निर्मिती करून किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी करण्याचे जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केरामांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला सुरुवात झाली असून आदिलाबाद व किनवटचे आमदार यांचे हस्ते लवकरच या रस्त्याचे लोकार्पन होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोगरवाडी व तेलंगणा राज्यातील उमरी या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची निर्मिती व्हावी अशी जनतेची स्वातंत्र्यपुर्व काळापासून आग्रही मागणी होती.याच मागणीच्या अनुषंगाने मागील विधानसभा निवडणुकांच्या काळात येथील जनतेने सदर रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी आ. भीमराव  केरामांकडे केल्याने त्यांनीही त्या मागणीची पुर्तता करू असा शब्द दिला होता. दरम्यान, दिल्या शब्दाला जागत जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून तसे

"धरती ही छान भिजली पाऊसही पडला चांगला शेतकरी राजा देखील आनंदाने नाहून गेला "

  शिक्षक कविंनी मृग नक्षत्रा निमित्त केली शब्दांची ऑनलाईन पेरणी.. " कविता शेती मातीच्या " 🌱🌱🌱 रोपाला पाणी घालून केले कार्यक्रमाचे उदघाटन अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम नांदेड ( प्रतिनिधी ) : मृग नक्षत्रा निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने औरंगाबाद विभागीय ऑनलाईन कविसंमेलन नुकतच संपन्न झालं या संमेलनाचे अध्यक्ष उस्मानाबाद येथील बाल साहित्यिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य समाधान शिकेतोड तर उद्घाटक मुंबई येथील अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे होते. प्रमुख पाहुणे  विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी होते. रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाले. श्री. मोरे यांनी उद्घाटकीय भाषणात विभागातील विविध जिल्हयाच्या शिक्षक कविना शुभेच्छा दिल्या.श्री मुनेश्वर यांनी मनोगत व्यक्त करून 'रानगंध ' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस

आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजुंना मदत

  ता. प्र.किनवट:-  नादेंड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल  तालुक्यात डोंगराळ जंगलव्याप्त भागात  वाडी गुडयावर आदिवासी  समाज  मोठ्या संख्येने  राहतो.       राज्यांत कोरोना संकटाचे थैमान चालु असल्याने कोरोनाच्या या भयाण काळात गेली दोन वर्षे सतत कडक लॉकडाऊन घोषित असल्याने हातावरचे पोट असणारी आदिवासी कुटुंब  जगण्याच्या मरण यातना भोगत होते. अशातच अनेक कुटुंब या कोरोना काळात उध्वस्त  झालेली पाहायला मिळाली. यातच काही कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावले होते. लोकांच्या हाताला कोणतेही कामं नाही.या भागातील आदिवासी कुटुंब इतरत्र कामं करण्यास स्थलांतर करत होते.मोल मजुरी करून गुजराण करणाऱ्या आदिवासी समाजावर या कडक लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्ण निर्माण झाला.अशा बिकट परिस्थिती  मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या हाताला कोणतेही कामं नसल्याने हातावरचे  पोट असणाऱ्याचे हाल होतांना दिसत होते.या काळात उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबांच्या यातना ही भयाण होत्या.ह्या सर्व गंभीर परिस्थीतीचा विचार करून आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधव  एकवटला अन सामाजिक दायित्व भावनेतून  अडचणीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांन

जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिना निमित्त किनवट येथे अभिवादन करण्यात आले

  ता. प्र.किनवट:- आज .दि ९ . आमदार भीमरावजी केराम यांचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालय    येथे महामानव क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा  यांच्या 121 व्या शंहिद दिना निमीत्त जनसंपर्क कार्यालयात प्रतिमा पुजन करून आभिवादन करण्यात आले या वेळी  प्रकाश  कुडमेथे ,उमांकात कऱ्हाळे  भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष , श्री जितेंन्द्र कुलसंगे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ,  युवा साहित्यिक संतोष पहूरकर ,  आदिवासी  युवा मोर्चा कार्यकर्ते, राजु मेश्राम , उत्तमराव वागडव एस टी ,महामंडळ कर्मचारी  उपस्थित होते.

मका, ज्वारी खरेदी दोन दिवसात सुरू करा - खासदार हेमंत पाटील अन्न नागरी पुरवठा व वित्त विभागाच्या सचिवांची घेतली भेट

किनवट /हिंगोली :  आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत किनवट तालुक्यातील भरडधान्य मका आणि ज्वारी खरेदी येत्या दोन दिवसात सुरु  करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील  आणि राज्याच्या वित्त विभागाचे  सचिव राजीव कुमार मित्तल व  अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक  यांची भेट घेऊन केली  . तातडीने  या मागणीची  दखल घेवून  हे खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना सचिवांनी दिले असून, लवकरच  खरेदी केंद्राला सुरवात होणार आहे .                   आधारभूत पणन २०२०-२१ अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने भरडधान्य खरेदी करण्यासाठी ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते,  त्यानुसार किनवट तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यानी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली . दरवर्षी मे महिन्यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्याचा मला खरेदी केला जातो , परंतु यंदा मे महिना उलटून गेला तरी खरेदी सुरु करण्यात आली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता . शेतकरी  आपलया घरातच माल ठेवून खरेदी केंद्र सुरु होण्याची

कु. प्रियंका ढोमणे( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यचारोळी स्पर्धा संपन्न

ता.४ जुन प्रतिनिधी नाशिक:- सुप्रसिध्द कवयीत्री साहित्यिका लेखिका प्रियंका भास्कर ढोमणे ( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य चारोळी समुहात राज्यस्तरीय विशेष भव्य चारोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ‍‌या काव्य स्पर्धेत ७५ वर कवी कवयीत्री सहभागी झाले होते. सर्वांनी एक से बढकर एक रचना सादर केल्या या मध्ये साहित्यीक अश्विनी मोरे,स्वहित कळंबटे,सचिन पाटील,योगीता शिरोरे,किर्ती बोरकर,सुदर्शन जाधव,स्मिता पाटील,माधुरी अमृतकर,सानिका येवले,साक्षी खाकरे सह online अनेकांनी सहभाग नोंदवीला व उपस्थीती दर्शवीली तर समुह संचालक  संयोजक महेंद्र पवार( माही), शिवराज अंदूरकर, अमित भगुंडे, मयुरी घोरपडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला  या वेळी प्रियंका ढोमणे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये खालील रचना  मनोगत   सादर करण्यात आल्या कवयित्री सौ. वैशाली साळुंखे रायगड यांनी - काव्यप्रिया नाव तुझे स्वभाव तुझा गोड माणुसकी मनातील तुझ्या साऱ्यांना लावते ओढ यानंतर -शरयु खाकरे यांनी - तुझ्या सारखी मिळाली मोठी बहीण मला  थोड पुण्य मिळलय मला  तुझ्या या वाढदिवशी खुप मिळाल्या  शुभेच्छा तुला -

खरीप हंगाम सुरु झाल्याने बाजारात बोगस खत बियाणे विक्रीस येऊन शेतकऱ्यांची फसवणुक होत आहे या करीता संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या पावित्र्यात -अजय कदम ( तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड किनवट)

  ता. प्र.किनवट:- येणाऱ्या खरीप हंगामात व्यापारा कडून बोगस खते व बोगस बियांणाची विक्री होऊनये यासाठी मराठा सेवा संघ प्रणित  संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील यांनी सहायक जिल्हाधिकारी कार्यालय यांना ता.२ रोजी या द्वारे निवेदन दिले आहे कोरोना व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थीक व्यवस्था डबघाईस गेलेली आहे त्यातच औषधे औजारे खते बियाणे अन्य वस्तु यांची भाववाड होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसु शकतो याकरीता संभाजी ब्रिगेड ने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुष्‍पाबाई मधुसूदन उमरे यांचेे निधन

  किनवट, दि.२ : सिद्धार्थनगर येथील जेष्ठ नागरिक पुष्‍पाबाई मधुसूदन उमरे(वय ६८) यांचे आज (ता.२) सकाळी सात वाजेच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.     त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात, सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज(दि.२) दुपारी चार वाजेच्या  सुमारास शांतीधाम बौद्ध स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पुष्पाबाई यांच्या चित्तेला मुलगा विवेक याने भडाग्नी दिला. प्रा. रविकांत सर्पे  यांच्या त्या थोरल्या बहिण होत.