Skip to main content

मका, ज्वारी खरेदी दोन दिवसात सुरू करा - खासदार हेमंत पाटील अन्न नागरी पुरवठा व वित्त विभागाच्या सचिवांची घेतली भेट


किनवट /हिंगोली :  आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत किनवट तालुक्यातील भरडधान्य मका आणि ज्वारी खरेदी येत्या दोन दिवसात सुरु  करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील  आणि राज्याच्या वित्त विभागाचे  सचिव राजीव कुमार मित्तल व  अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक  यांची भेट घेऊन केली  . तातडीने  या मागणीची  दखल घेवून  हे खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना सचिवांनी दिले असून, लवकरच  खरेदी केंद्राला सुरवात होणार आहे .

                  आधारभूत पणन २०२०-२१ अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने भरडधान्य खरेदी करण्यासाठी ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते,  त्यानुसार किनवट तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यानी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली . दरवर्षी मे महिन्यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्याचा मला खरेदी केला जातो , परंतु यंदा मे महिना उलटून गेला तरी खरेदी सुरु करण्यात आली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता . शेतकरी  आपलया घरातच माल ठेवून खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा करत होते . किनवट, माहूर हे आदिवासी बहुल तालुके असून याभागातील खरेदी केंद्र सुरु करावेत याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी  गतवर्षी सुद्धा केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा करून ,केंद्र सुरु करून घेतले होते व तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता . शासनाच्या धोरणानुसार याभागातील शेतकरी दरवर्षी मक्याचे उत्पादन घेत असतात . यंदाच्या हंगामात सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी सुरवातीला खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी मागणी करून मान्यता मिळवून आणली होती . अन्न नगरी पुरवठा विभागाने यास परवानगी सुद्धा दिली होती.  परंतु प्रत्यक्षात खरेदीला सुरवात न झाल्याने  अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी  खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयात अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांची यासंदर्भाने भेट घेतली. यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की अगोदरच कोरोनामुळे शेतमालाला भाव मिळत नसून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.म्हणूनच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  या भागातील खरेदी केंद्र सुरू करावेत .सचिवांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. लवकरच   मका आणि ज्वारी खरेदी सुरु होऊन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल असे सचिव विलास पाटील यांनी सांगितले.खासदार हेमंत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केल्यामुळे प्रलंबित कामाला गती मिळणार आहे .

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...