Skip to main content

किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी रस्ता होणार जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केराम प्रत्यक्षात उतरवणार



 



किनवट तालुका प्रतिनिधी:-

स्वातंत्र्यपुर्व काळापासून मागणी असलेला किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी या गावांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता बांधकामाला मूर्तरूप देण्यासाठी जनतेच्या मागणीचा सलग पाठपुरावा करत या रस्त्याची निर्मिती करून किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी करण्याचे जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केरामांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला सुरुवात झाली असून आदिलाबाद व किनवटचे आमदार यांचे हस्ते लवकरच या रस्त्याचे लोकार्पन होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोगरवाडी व तेलंगणा राज्यातील उमरी या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची निर्मिती व्हावी अशी जनतेची स्वातंत्र्यपुर्व काळापासून आग्रही मागणी होती.याच मागणीच्या अनुषंगाने मागील विधानसभा निवडणुकांच्या काळात येथील जनतेने सदर रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी



आ. भीमराव  केरामांकडे केल्याने त्यांनीही त्या मागणीची पुर्तता करू असा शब्द दिला होता. दरम्यान, दिल्या शब्दाला जागत जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून तसेच विविध विभागांच्या तांत्रिक अडचणींना दूर सारून घोगरवाडी ते उमरी या तीन किलोमीटरचा रस्ता निर्मिती करण्याचे मोलिक कार्य आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात साकार झाले आहे.विशेष म्हणजे उमरी पासून कोसाई हे अंतर अवघे दोन किमी असून आदिलाबाद हे अंतर पंधरा किलोमीटरच्या जवळपास आहे.एरव्ही किनवट व परिसरातील नागरिकांना आदिलाबाकडे जाय्यचे झाल्यास ७० ते ७५ किलोमीटरचा प्रवास करून हे अंतर कापावे लागत होते.परंतू, किनवट वरून घोगरवाडी ते उमरी या मार्गाने हे अंतर तब्बल ३० किलोमीटर ने कमी होणार असून किनवट व परिसरातील जनतेसाठी आदिलाबाद हे अधिकचे जवळ येणार आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्यांसाठी हा मार्ग हा अधिकच सुखकर होणार असून शिक्षण रस्ता व आरोग्य या आवश्यक सोयी सुविधासाठी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तेलंगणातील आदिलाबादचे खासदार बापूराव सोयाम यांच्यासह आमदार बापूराव राठोड, किनवट- माहूरचे आमदार भीमराव  केराम यांच्या हस्ते लवकरच या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडून रस्ता जनतेसाठी खुला होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.शिवाय आज दि. १३ जून रोजी या रस्ता निर्माण कामाची पाहणी आमदार भीमराव केराम,सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार,तहसीलदार अनिता कोलगने,उद्योजक अनिल तिरमनवार , सरपंच आत्माराम मुंडे,दत्ता आडे आदींनी केली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...