Skip to main content

आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजुंना मदत

 


ता. प्र.किनवट:-

 नादेंड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल  तालुक्यात डोंगराळ जंगलव्याप्त भागात  वाडी गुडयावर आदिवासी  समाज  मोठ्या संख्येने  राहतो.

      राज्यांत कोरोना संकटाचे थैमान चालु असल्याने कोरोनाच्या या भयाण काळात गेली दोन वर्षे सतत कडक लॉकडाऊन घोषित असल्याने हातावरचे पोट असणारी आदिवासी कुटुंब  जगण्याच्या मरण यातना भोगत होते. अशातच अनेक कुटुंब या कोरोना काळात उध्वस्त  झालेली पाहायला मिळाली. यातच काही कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावले होते. लोकांच्या हाताला कोणतेही कामं नाही.या भागातील आदिवासी कुटुंब इतरत्र कामं करण्यास स्थलांतर करत होते.मोल मजुरी करून गुजराण करणाऱ्या आदिवासी समाजावर या कडक लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्ण निर्माण झाला.अशा बिकट परिस्थिती  मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या हाताला कोणतेही कामं नसल्याने हातावरचे  पोट असणाऱ्याचे हाल होतांना दिसत होते.या काळात उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबांच्या यातना ही भयाण होत्या.ह्या सर्व गंभीर परिस्थीतीचा विचार करून आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधव  एकवटला अन सामाजिक दायित्व भावनेतून  अडचणीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना मदत करण्याचे निर्णय घेत सोशियल मीडिया गृपद्वारे ऑनलाईन पद्धतीने मदत निधी गोळा करून त्या जमा रक्कमेतुन दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तुची खरेदी करून अन्नपूर्णा किट वाटप करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले.या उपक्रमा अंतर्गत प्रथम टप्प्यात मौजे पिंपळगांव (सि) , तलाईगुडा , भिलगांव , पळशी , लालुनाईकतांडा , जरुर , मांडवी , गणेशपुर , नागापूर , दरसावंगी , लिंगी , उनकेश्वर , बोथ , उमरी (बा) , निराळा आदी गावांना भेटी देत गावांतील अनाथ , अपंग , विधवा , वेडसर , दारिद्य्र रेषेखालील , भूमिहीन , उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबीयांच्या व्यथा जाणून त्यांना कोरोना पासुन घ्यावयाची काळजी सांगत त्यांना अन्नपूर्णा किट देण्यात आले.अशा प्रकारे एकूण 50 अन्नपूर्णा किराणा सामानाची किट वाटप करण्यात आले असून या उपक्रमाचे अध्यक्ष सुभाष कन्नाके , कार्यअध्यक्ष गोपाल कन्नाके , उपाध्यक्ष रामदास मेश्राम , सचिव मूरहारी कन्नाके , कोषाध्यक्ष शोभा कुमरे , गणेश डोंगरे , प्रसिद्धी प्रमुख प्रणय कोवे ,  सदस्य रमेश परचाके , संतोष पोहूरकर , शशांक कन्नाके , सौरभ कन्नाके  आदीनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.?

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...