Skip to main content

बळीराम पाटील महाविद्यालयात रासेयोच्या वतीनेआंतराष्ट्रीय योग दिवस साजरा


किनवट शहर प्रतिनिधी:-

 मन व शरीर सुदृढ ढेवण्यासाठी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले.या आजारावर मात करण्यासाठी नियमित योगा करणे हे अत्यावश्यक आहे.विविध आजारापासून रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपण योगाचे महत्त्व जाणून घ्यावे. असे मत बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग शिक्षक देविदास मुनेश्वर यांनी व्यक्त केले.



 किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी देविदास मुनेश्वर यांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना देविदास मुनेश्वर यांनी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे आहे.प्राचीन काळापासून योग केले जाते.माणसाला सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करावे.भारतात अनेक विद्यापीठातून योगाचे शिक्षण दिले जाते.योगामुळे मन व शरीर सुदृढ राहते. आपण कपाल भारती, भसरीका प्रणायन, मेरुदंड, पवनमुक्त असंन ,सर्वांगन असन, शुक्ष्म वायाम,बाह्य प्रणायम, हस्य योग,विविध असंन आपण नियमित करावे.जीवनात आनंदी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. असे सांगून प्रात्यक्षिकासह विविध असन करुन दाखविले.

 याप्रसंगी सेवानिवृत्त तलाठी मुक्तीराम घुगे साहेब, माजी उपप्राचार्य प्रा.राजकुमार नेम्मानीवार, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस .एस,क्रिडा विभागप्रमुख प्रा.मधुकर पवार, संगणक विभाग प्रमुख डॉ.योगेश सोमवंशी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. शुंभागी दिवे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार,लक्ष्मीबाई पुठ्ठावार, सुधीर पाटील ,यांची उपस्थिती होती.आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...