केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली महागाई जिवनावश्यक वस्तु पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन
ता. प्र.किनवट:-
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामूळे मागील वर्षभरात जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल, डिझेल तसेच बी बियाणे, खतांचे दर गगनाला भिडले आहे.या महागाईत सामन्य वर्ग होरपळून निघत आहे त्यामुळे सरकार च्या या धोरना विरोधात आज किनवट वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तालुका अध्यक्ष किशनराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले या वेळी तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, सचिव राहुल कापसे, मिलींद वाठोरे, सम्राट कावळे, संजय गुरनुले, दया पाटील प्रहार शक्ति संघटनेचे अभय नगराळे, वासाटे, आनंदराव बेंद्रे, विलास भवरे, मारोती भुरके, ऋषीकेश कांबळे, ज्ञानेश्वर खरे, अदित्य भवरे, गंगाधर कदम, जनार्धन भवरे, दत्ता गडलवाड विठ्ठल गडपाळ आदी उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.
Comments
Post a Comment