Skip to main content

कु. प्रियंका ढोमणे( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यचारोळी स्पर्धा संपन्न



ता.४ जुन

प्रतिनिधी नाशिक:-

सुप्रसिध्द कवयीत्री साहित्यिका लेखिका प्रियंका भास्कर ढोमणे ( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य चारोळी समुहात राज्यस्तरीय विशेष भव्य चारोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ‍‌या काव्य स्पर्धेत ७५ वर कवी कवयीत्री सहभागी झाले होते. सर्वांनी एक से बढकर एक रचना सादर केल्या या मध्ये साहित्यीक

अश्विनी मोरे,स्वहित कळंबटे,सचिन पाटील,योगीता शिरोरे,किर्ती बोरकर,सुदर्शन जाधव,स्मिता पाटील,माधुरी अमृतकर,सानिका येवले,साक्षी खाकरे सह online अनेकांनी सहभाग नोंदवीला व उपस्थीती दर्शवीली तर समुह संचालक  संयोजक महेंद्र पवार( माही), शिवराज अंदूरकर, अमित भगुंडे, मयुरी घोरपडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला 

या वेळी प्रियंका ढोमणे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


यामध्ये खालील रचना  मनोगत  सादर करण्यात

आल्या

कवयित्री सौ. वैशाली साळुंखे रायगड यांनी
- काव्यप्रिया नाव तुझे
स्वभाव तुझा गोड
माणुसकी मनातील तुझ्या
साऱ्यांना लावते ओढ


यानंतर

-शरयु खाकरे यांनी

-

तुझ्या सारखी मिळाली मोठी बहीण मला 

थोड पुण्य मिळलय मला 

तुझ्या या वाढदिवशी खुप मिळाल्या 

शुभेच्छा तुला


-सौ. सुषमा शितोळे पुणे यांनी

-काव्य प्रिया तु समुहाची

लाडकी लेक सर्वांची

लावण्यवती स्वरूपाची

तेवढीच स्वच्छ मनाची

हि छान रचना केली


यां नंतर

-सौ. रचना चिंतावार नाशिक यांनी


नाव तुझे काव्य प्रिया 

साहित्यकणाची खाण

सर्वाची गोड लाडकी तु 

किर्ती लहान मुर्ती महान

-

तर साक्षी खाकरे यांनी

-तुझे दिलदार व्यक्तीमत्व सर्वांच्या

मनात रुजुदे आजच्या दिवशी

माझ्या शुभेच्छा स्वीकारून घे

भरभरून आशीर्वाद मिळो तुला
हिच माझी सदीच्छा

-शंकर पाटील अलिबाग यांनी

काव्यप्रिया तु महाराष्ट्राची

आहेस कवयित्री महान

प्रेमाने सर्वांना जिंकून सतत

वाढवतेस साहित्याची शान

-

मिलींद कोथिंबीरे श्रीगोंदा यांनी


नाव तुझे गं प्रियांका

      सर्वांचीच तू लाडकी,

केला सांभाळ भावाचा

      नाही त्यास तू परकी


आदींनी दर्जेदार रचना मांडल्या व वाढदिवस साजरा केला.


मनोगत

-*🌹विषय=काव्यप्रिया🌹*

*शीर्षक - काव्य शुभेच्छा*

 

*🌹❤️दोन शब्द पियुसाठी*❤️🌹*

पियुचं व्यक्तीमहत्व कवितेत  मावेल इतकं छोटं नाही म्हणून मी कविता न लिहिता तिच्या वाढदिवसा निमित्त दोन शब्द लिहिणार आहे,मनापासून लिहिते मला फक्त पियु ची स्तुती करायची आहे म्हणून नाही,तर तिच्या व्यक्तीमहत्वाशी निगडित खरं लिहिणार आहे,पियु  दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती मनाने सुंदर आहे, मनमिळाऊ, प्रेमळ,आहे, पियु शी कधीही बोला ती आदराने आणि प्रेमानेच बोलते,पियु माझ्यापेक्षा लहान आहे पण तरी तिच्या व्यक्तिमह्त्वाचा हेवा करावासा वाटतो ,खूप कमी वयात तीने बऱ्याच गोष्टीत यश मिळवलं आहे,सर्वात महत्वाचे म्हणजे तिने सर्वांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली आहे,प्रत्येकाच्या हृदयात जागा करणं वाटतं तेवढ सोपं नाही त्याला खूप मोठं मन लागतं.

         🌹🌹🌹गुलाबा सारखी सुंदर असणारी माझी पियु, मनाने मोगऱ्यासारखी सुगधं देणारी आहे....... 🌺🌺जास्वंदासारखी चेऱ्यावर लाली असणारी,लाजाळू सारखी लाजणारी आहे......स्वभावणे ती चाफ्यासारखी मनमोहक करणारी आहे.......... शब्दांनी ती आपल्याला सुर्यफुलासारखी🌻🌻 प्रभावित करणारी आहे.........अशी माझी  गोड पियु  सफळ्यात वेगळी आहे.

        काव्यक्षेत्रात मला बरेच अनुभव आलेत की लिखाण करणारे लोक त्यांच्याच विश्वात असतात प्रत्येक लिखाण करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की माझ्या सारखं हुशार कोणीच नाही पण काव्यक्षेत्रातली *काव्यप्रिया* ची एक वेगळी ओळख आहे ती सर्वाना सोबत घेऊन चालते,काव्यप्रिया मला मनाने खूप हळवी नाजूक वाटते,पण संकटांना तोंड देण्याची ही तिला तितकीच हिम्मत आहे,आई वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याची धम्मक तुझ्यात आहे तुझे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होहोत आणि काव्यक्षेत्रात तू खूप उंच भरारी घेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.


*माझ्या गोड पियु ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा*........ 🍫🍫🎂🎂🌹🌹🌹💐💐❤️❤️🥰🥰🥰


*@अश्विनी मोरे@*




Comments

  1. फारच सुंदर कार्यक्रम झाला समाजरत्न बरोबरच काव्यचारोळी समूह परिवारातर्फे कु.प्रियंका भास्कर ढोमणे(पियु)यांचा विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला..त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  2. फारच सुंदर कार्यक्रम झाला समाजरत्न बरोबरच काव्यचारोळी समूह परिवारातर्फे कु.प्रियंका भास्कर ढोमणे(पियु)यांचा विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला..त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...