Skip to main content

"धरती ही छान भिजली पाऊसही पडला चांगला शेतकरी राजा देखील आनंदाने नाहून गेला "

 


शिक्षक कविंनी मृग नक्षत्रा निमित्त केली शब्दांची ऑनलाईन पेरणी.. " कविता शेती मातीच्या " 🌱🌱🌱

रोपाला पाणी घालून केले कार्यक्रमाचे उदघाटन

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम

नांदेड ( प्रतिनिधी ) :

मृग नक्षत्रा निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने औरंगाबाद विभागीय ऑनलाईन कविसंमेलन नुकतच संपन्न झालं या संमेलनाचे अध्यक्ष उस्मानाबाद येथील बाल साहित्यिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य समाधान शिकेतोड तर उद्घाटक मुंबई येथील अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे होते. प्रमुख पाहुणे  विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी होते.


रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाले. श्री. मोरे यांनी उद्घाटकीय भाषणात विभागातील विविध जिल्हयाच्या शिक्षक कविना शुभेच्छा दिल्या.श्री मुनेश्वर यांनी मनोगत व्यक्त करून 'रानगंध ' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस रुपेश मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून आभार मानले. कविसंमेलनात गझलकार चंद्रकांत कदम, हृदयक्षर मिलिंद कंधारे, स्तंभलेखक नासा येवतीकर, कवयत्री अर्चना गरुड, महानंदा चिभडे, विजया तारू, कवीमित्र दर्शन जोशी, साहेबराव डोंगरे, भुमया इंदूरवार, सचिन बेंडभर , रामस्वरूपमडावी आदी सहभागी होते.


कवीसंमेलनाध्यक्ष समाधान शिकेतोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता सादर केली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली..

"औत हाकला हाकला

 बाप थकला थकला 

कधी मस्तक फुटलं

औताच्या दांडीन 

सुटलेलं रूमण 

धरिता मांडीन "



गझलकार चंद्रकांत कदम यांनी शेती मातीच्या या विषयावरील सुंदर अशी रचना सादर करून दाद मिळवली..

"धर्माच्या पंथाच्या जातीच्या पातीच्या 

जागर करू या कवितांचा शेतीच्या मातीच्या 

कसा लागला क्रांतिकारी शेतीचा शोध 

मानवतेला कळू लागले हिरवे संबोध "


साहेबराव डोंगरे यांनी सुंदर गेय कविता गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला..

"लागे मज लढा शेतीचा शेतीचा

 मोहवी मना गंध हा मातीचा 

तृप्त मातीत पिता पावसाचे पाणी 

जोजवी बीजाची पिले तानी तानी 

झाडे वेली गाणी आनंदाची गाणी "



हृदयक्षर मिलिंद कंधारे यांनी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कवितेतून उद्युक्त केले..

"काही पानावर पडलाय मावा

 काही कुरतडले जात आहेत

 हळुवार मशागत चुकीची 

पक्की फसली पेरणी 

मेहनतीचे वाभाडे निघाले 

कळेना काय झाले ? "


महानंदा चिभडे या कवयित्रीने निसर्गाच्या सानिध्यातली सुंदर रचना सादर केली..

"धरणी माय माझी घेई सामावून  पाणी 

आणि शेतकरी मग पिकवी हिरवे रान 

पोटात आमच्या तृप्ती आराम

 बाकी बळीराजा काही दाम "



स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी पावसावरची आणि शेतकऱ्यांच्या समस्या वरती कविता सादर केली..

"धरती ही छान भिजली

 पाऊसही पडला चांगला 

शेतकरी राजा देखील 

आनंदाने नाहून गेला "


कवियत्री अर्चना गरुड ह्यांनी निसर्गातील रम्य वातावरणातील सुंदर रचना सादर केली..

"लागे मृगाची चाहूल 

सजे बळी राजा रानी 

नदी-नाले खळाळत 

गाती झुळझुळ गाणी "



कवी सचिन बेंडभर यांनी पिकाची गाणी गेय कविता सादर केली..

"गात गाणी फिरे पाणी पाटातूनी खळखळ

तृष्णा भागवी पिकाची छाया धरते आभाळ "


विजया तारु  यांनी मृग नक्षत्रावर सुंदर कविता सादर  केली..

"मृग नक्षत्राच्या सरी धडकता

 गंध दरवळतो मातीचे 

त्या गंधातून वीज चमकता 

रंग फुलवता धरतीचे "



भुमया इंदुरवार यांनी पावसाच्या अन शेतीच्या कविता सादर केली..

"थेंब पावसाचे येता माती गर्भार राहिली 

काळ्या मातीने मातीत रूप आपले पाहिली "


"कणाकणात जगाच्या मनामनात बोलतो 

माझा विठू पांडुरंग 

माझ्या शिवारी डोलतो "

 दर्शन जोशी या कवींनी पांडुरंग अन शिवार यांचे सुंदर असे मिश्रण करून गेय कविता सादर करून वाहवा मिळवली.


हा कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वर प्रसारित झाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असंख्य रसिक ऑनलाइन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.