साईप्रसाद जटालवार यांच्याकडून माधव मेकेवाड यांच्यावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले....
बहुचर्चित असलेले माधव मेकेवाड यांचा अखेर अर्ज मंजूर भोकर:-(प्रतिनिधी) आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-मोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांचे कार्यालयातील बैठक सभागृहात प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननीची प्रक्रीया सुरु करण्यात आली. श्री माधव नरसिंग मेकेवाड या उमेदरवाराचे नामनिर्देशनपत्राची छाननी सुरु असताना आक्षेप अर्जदार यांनी श्री. माधव नरसिंग मेकेवाड यांनी दिनांक 29/10/2024 रोजी सादर केलेल्या नामनिर्देशन आक्षेप सादर करण्यात आला असे की, माधव नरसिंग मेकेवाड यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले शपथपत्र है निवडणूक आयोगानी निर्देशीत केलेल्या स्वरुपात (फॉरमेंट) मध्ये नाही. त्यांनी त्यांचे स्वतःच्या मनाने फॉरमॅट तयार करून काही रकाने वगळून तयार केले असून त्यामध्ये त्यांनी बरीचशी माहिती नियमाप्रमाणे लिहीलेली नाही. त्यांनी मतदारांना प्रभावीत करण्या करीता त्याच्या शपथपत्रात सर्व अवलंबीत व्यक्तींची माहिती पुर्णपणे लिहीलेली नाही. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशपत्र नामंजूर करावे अशी साईप्रसाद जटालवार यांनी ऍड.सलीम (जिल्हासत्र न्य...