Skip to main content

ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांची कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयास क्षेत्रभेट




ग्रंथालय व माहितीशास्त्रच्या विद्यार्थ्यांना कै.रामतिर्थकर सार्वजनिक ग्रंथालयांची माहिती करून देतांना प्राध्यापक व ग्रंथपाल


किनवट,ता.२०( बातमीदार): महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा(ता.किनवट) येथिल ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या इयत्ता ११  वी आणि १२ वी मध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुभाष नगरातील  कै.कांताराव रामतीर्थकर सार्वजनिक वाचनालयास  शनिवारी(ता.१९) भेट दिली.महाविद्यालयीन अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीच्या उपक्रमांतर्गत ही शैक्षणिक भेट होती.

   या कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ  कार्यकर्ते ॲड. मिलिंद सर्पे, वाचनालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामतीर्थकर, प्रा.सुबोध सर्पे,ग्रंथपाल मयुरी  रामतीर्थकर, ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर आधी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने ॲड.मिलिंद सर्पे, प्रा. सुबोध सर्पे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थिनीस व एका विद्यार्थ्यास पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

   सार्वजनिक वाचनालयाची व्यवस्थापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आलेले होते.महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र  या विषयाचे प्रा.सुबोध सर्पे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्वाचे दस्तऐवज, मराठी साहित्यामधील विविध पुस्तके, ग्रंथ देवघेव पद्धती, मुक्त प्रवेश पद्धत,बंदिस्त प्रवेश पद्धत, ग्रंथालयाचे प्रकार याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर अशी प्रात्यक्षिक माहिती  दिली. वाचनालयाचे अध्यक्ष उद्धव रामतीर्थकर यावेळी  बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुस्तके  जीवन घडवण्याची काम करतात. सार्वजनिक ग्रंथालये  ही समाजातील लोकांचे निरंतर शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत.

या क्षेत्रभेटीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲड. मिलिंद सर्पे यांनी सार्वजनिक ग्रंथालय चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विद्यालयातील ६० विद्यार्थी उपस्थित होते. या क्षेत्रभेटीतून ज्ञानवर्धक माहिती आम्हास मिळाली अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ग्रंथपाल मयुरी रामतीर्थकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...