किनवट/प्रतिनिधी-
महायुतीचे उमेदवार भीमराव केराम आणि सचिन नाईक मित्रमंडळाचे उमेदवार सचिन नाईकांनी सोमवारी उमेदवारी भरतांना केलेल्या जनशकी प्रदर्शनाला तोडीस तोड असे आज नामांकनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीचे उमेदवार प्रदीप नाईकांनी सुद्धा जनशक्ती प्रदर्शन करीत दुपारी नामांकनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी घराघरापर्यंत तुतारी पोहोचविण्याचे आवाहन केले.
उमेदवारी भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने खा. नागेश पाटील आष्टीकरांच्या बदल्यात त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकरांनी किनवट विधानसभेची प्रदीप नाईकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी हजेरी लावली. रॅलीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर अनेक मान्यवर सभामंचावर उपस्थिती दिसून आली.
यावेळी प्रदिप नाईक यांनी यंदा महाविकास आघाडीच गुलाल उधळूनार असा ठाम विश्वास माजी आमदार प्रदिप नाईक यांनी व्यक्त केला.
या वेळी सौ.बेबी ताई प्रदीप नाईक सौ. डॉ.सुप्रियाताई कपिल , अरुण आळणे, मा. रेड्डी , के.मुर्ती, साजीद खान , प्रवीण राठोड, गिरीश नेमान्निवार, राहुल नाईक, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, आशाताई कदम , प्रिती मुनेश्वर, शेख परवीन,फारूख चव्हाण, केशवे,
यांच्या सह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा
शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते , असंख्य किनवट माहुरच्या गावकरी नागरीकांची उपस्थीती होती.
Comments
Post a Comment