किनवट/प्रतिनिधी-
महायुतीचे उमेदवार भीमराव केराम आणि सचिन नाईक मित्रमंडळाचे उमेदवार सचिन नाईकांनी सोमवारी उमेदवारी भरतांना केलेल्या जनशकी प्रदर्शनाला तोडीस तोड असे आज नामांकनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीचे उमेदवार प्रदीप नाईकांनी सुद्धा जनशकी प्रदर्शन करीत दुपारी नामांकनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी घराघरापर्यंत तुतारी पोहोचविण्याचे आवाहन केले.
उमेदवारी भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने खा. नागेश पाटील आष्टीकरांच्या बदल्यात त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकरांनी किनवट विधानसभेची प्रदीप नाईकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी हजेरी लावली. रॅलीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उवाठा
शिक्सेना आणि काँग्रेसच्या मान्यवरांची सभामंचावर उपस्थिती दिसून आली. जनशकी प्रदर्शनाची तुलनात्मक दृष्ट्या समिक्षा केल्यास महाविकास आघाडीनेही महायुती आणि सचिन नाईक मित्रमंडळाच्या उमेदवारांना ताकद दाखऊन दिली हे विशेष.
डॉ. पुंडलीक आमलेंनी उमेदवारी
अर्ज दाखल केला
वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत
उमेदवारी ही डॉ. आमले यांना देण्यात आली. त्यांनी आज शेवटच्या दिवशी नामांकनपत्र दाखल केले. जनशक्ती प्रदर्शन करण्यात आलेले नव्हते. कार्यकत्यांचा लोंढामात्र त्यांच्या सोक्त दिसून आला. लोक आग्रहास्तव डॉ. आमले निवडणुकीत उतरले आहेत. नेते हमराज उईकें सारखे दिग्गज प्रचारात त्यांच्या सोवत असणार आहेत. उमेदवारी अर्जावर प्रविण गायकवाड, निखील वाघमारे, महेंद्र वासाटे, सुधाकर हलवले, दूधराम राठोड, रितेश कनाके,
दिनेश कांबळे यांच्यासह अन्य दहाजन सूचक व अनुमोदक असल्याचे सांगण्यात आले.
लोक आग्रहास्तव निवडणूक मैदानात
बळीराम पाटील महाविद्यालयाच्या किनवट शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचा वाद न्यायीक मागणीसाठी न्यायप्रविष्ठ असल्यामुळे प्रा. विजय खुपसेंना एनओसी मिळणे जसे दुरापास्त झाले तद्वतच प्रा. खुपसेंनी राजिनामा जरी दिला असता तर मंजूर सुद्धा करायला संस्थेच्या संचालक मंडळाची आवश्यकता भासली असती. विना राजिनामा आणि एनओसी शिवाय यापुर्वी उमेदवारी टिकल्याची अनेक उदाहरणे असल्याचे सांगून प्रा. खुपसे म्हणाले लोकांच्या आग्रहाखातीर मैदानात उतरावे लागल्याचे सांगितले. विठ्ठलराव वाकोडे, बळीराम शेळके, दत्ता बोडके, स.सलीम स.फरीद, संदीप बोडके, विनोद खुपसे, अशोक खुपसे, गजानन फोले, अवानाश डुकरे, सुनिल वाळके हे प्रा. खुपसेंच्या अपक्ष उमेदवारीचे सूचक आणि अनुमोदक आहेत.
Comments
Post a Comment