किनवट (प्रतिनिधी) -
जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीकडून आमदार भीमराव केराम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज पुरुषांपेक्षा महिलांची अलोटगर्दी करुन लक्षवेधी शक्तीप्रदर्शन केले. सचिन नाईक मित्रमंडळाकडून सचिन नाईकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
२८ ऑक्टोबर रोजी दुपारी हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघूनाथशहा मैदानापासून शहराच्या मुख्य मार्गान उपविभागीय कार्यालयात म हायुतीकडून आमदार भीमराव
केरामांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या
महायुती वि शंखनाद भीमराव रामजी
उपस्थितीत आणि आनंद म च्छेवार, अविनाश राठोड, दिनकर चाडावार, बाबूराव केंद्रे, बालाजी
आलेवार, सुनिल पाटील, संतोष चनमनवार, स्वागत आयनेनीवार, राधा कांबळे, पद्मा गिन्हे, सागर शिंदे, सुजाता उपलेंचवार, मुसाखान या सुचकांच्या उपस्थितीत नामांकन भरण्यात आले. महायुती आणि सचिन नाईक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन किनवट मध्ये अलोट गर्दी केली होती. आदिवासी समाजाचे घुसाडी, डंडार नृत्याने किनवटकराचे लक्ष वेधले होते. २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) प्रदीप नाईक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Comments
Post a Comment