Skip to main content

सेवापुर्ति निमित्त महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात कार्यक्रम संपन्न

  


किनवट,दि.३: मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी(ता.किनवट व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा( किनवट) येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवापुर्ती सोहळा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी(दि.१) रात्री आठ वाजता मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल, कोठारी( ता.किनवट) येथे उत्साहात साजरा झाला.

 कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम हे होते. प्रमुख पाहुणे आनंदराव वाढे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,नांदेड, अनिल महामुने, अधिक्षक, शालेय पोषण आहार,किनवट, सौ.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले क.म.वि.घोटी,म.ज्यो.फुले.मा.व.उमावि.गोकुंदा, किनवट संस्थेचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा, किनवट चे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके,आनंद मच्छेवार,माजी नगराध्यक्ष,किनवट आदी विचारमंचावर उपस्थित होते.



     सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अतिथी देवो भव्य ! या भारतीय संस्कृतीला जपत आलेल्या मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांनी या सेवापुर्ती सोहळ्याच्या आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली.

या सेवापुर्ती सोहळ्यात तब्बल १२ कर्मचाऱ्यांना सहकुटुंब शाल, पुष्पगुच्छ आणि वस्त्ररूपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पूर्व मुख्याध्यापक एच.ए.शेख, उपप्राचार्य एस.के.राऊत, उपमुख्याध्यापक जे.एस.पठाण, पर्यवेक्षक,एस.डी.वाठोरे,

पर्यवेक्षक श्री.व्ही.ए.चव्हाण, श्रीमती एम.एस.सर्पे, वरिष्ठ लिपिक श्री.ए.एम.सर्पे,श्री.आर.एच. येरेकार,श्री.एस.जी.तम्मेवार, श्री.पी.जी.घुले ,श्री.जी.डी.दामोधर, सेवक एन.एस.देवतळे यांचा समावेश होता. 

  या सेवापुर्ती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना आंनदराव ठमके व मातोश्री कमलताई ठमके यांनी जे इवलसं रोपट लावलं होतं त्याचा वटवृक्ष होत असताना "यांची देही याची डोळा" पाहण्याचा योग अभियंता श्री. प्रशांत ठमके आणि सौ.शुभांगीताई ठमके या दाम्पत्यामुळे आला,असे भावपूर्ण उद्गार सत्कारमुर्तीनी काढले.

याप्रसंगी कृतज्ञ भावनेने प्रा.मायावती सर्पे यांनी संस्थेच्या विद्यार्थी सहाय्यता कक्षाच्या दोन विभागास  एकविस हजार रूपयांचे दोन धनादेश

मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाधीन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव केराम यांनी  यांनी संस्थेचे सचिव अभि.श्री.प्रशांत ठमके व  कोषाध्यक्षा सौ.शुभांगीताई ठमके यांनी किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात जो शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे त्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या वतीने जो सेवापुर्ती आनंद सोहळा आयोजित करण्यात आला तो खऱ्या अर्थाने पारिवारिक सोहळा भासला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य आर.ए.जाधव, उपमुख्याध्यापक पी.जी.मुनेशवर, पर्यवेक्षक किशोर डांगे सर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर,बंडु भाटशंकर सर,प्रशांत डवरे सर,आदींनी परिश्रम घेतले.या सेवापुर्ती समारंभास मोठ्या संख्येने पत्रकार बांधव, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक, मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते सदर कार्यक्रमा सूत्रसंचलन पर्यवेक्षक प्रा.एस.ए.बैसठाकुर यांनी केले तर आभार प्रज्ञा मॅडम यांनी मानले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...