किनवट प्रतिनिधी/ राजेश पाटील-
दि. २,३,४,५ जानेवारी २०२६मध्ये होणाऱ्या पुणे येथील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल काव्य महोत्सवासाठी किनवट येथुन शिव-फुले- शाहु- आंबेडकर प्रबोधन चळवळीतील कवी गितकार अशोक वासाटे पहिले सत्राचे अध्यक्ष म्हणून तर दुसऱ्या सत्रात शाहीर दिलीप कोसले यांची निवड करण्यात आली आहे.
एस. एम. जोशी फौंडेशन पुणे सभागृहात पार पडणाऱ्या या महोत्सवासाठी आयोजक विजय वडवेराव आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान यांचे नुकतेच निवड पत्र प्राप्त झाले आहे .
क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले, व क्रा.महात्मा जोतीबा फुले यांचे विचार समाजात रुजवुन संविधान जन जागृती गेल्या विस वर्षा पासून वासाटे व कोसले करत आले आहेत त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दत्ता राठोड, गणेश शेवाळे, आत्मानंद सत्यवंश, चंद्रकांत दर्शनवाड, प्रकाश येरेकार, डॉ. लोमटे, डॉ. डोखळे, साहेबराव वाढवे, राजेश घोडाम, रामा सोनुले, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, दिलीप मुनेश्वर,गौतम कनिंदे, महेंद्र नरवाडे, उत्तम कनिंदे, अनिल उमरे सह परिसरातील साहित्यिक कवी गायक प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment