किनवट | प्रतिनिधी: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती, किल्ले वाफगाव यांच्या वतीने किनवट तालुका प्रतिनिधी म्हणून श्री. अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा आदेश समिती प्रमुख श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दिला. महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका पातळीवर समन्वय साधणे, जनसहभाग वाढविणे तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अमन कुंडगीर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमन कुंडगीर यांच्या सामाजिक सहभागाचा आणि कार्याचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महोत्सव अधिक व्यापक आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल किनवट तालुक्यातून अमन कुंडगीर यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com