किनवटमध्ये सुजाता एंड्रलवार यांचा ऐतिहासिक विजय...
राजेश पाटील/ किनवट (प्रतिनिधी)
किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा रणसंग्राम अखेर आज संपुष्टात आले.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सुजाता विनोद एंड्रलवार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना हरवत १०,४७३ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला.
त्यांनी भाजपाच्या उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार यांचा ३,९९६ मतांच्या फरकाने पराभव केला. आज रविवारी पार पडलेल्या मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सुजाता यंडूलवार यांनी आघाडी कायम ठेवली होती. निवडणुकीच्या
निकालामुळे शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, नवीन राजकीय समीकरणे अधोरेखित झाली आहेत. नगराध्यक्षपद : कोणाला किती मते? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण १९,००८ वैध मते नोंदवली गेली. मतदारांनी सुजाता यंन्ड्रलवार यांच्या पारड्यात कौल दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. सुजाता विनोद यंन्ड्रलवार (शिवसेना उबाठा): १०,४७३ (विजयी), पुष्पा आनंद मच्छेवार(भाजपा) ,६,४७७,काजी राहत तबस्सुम (AIMIM): ८६२ /,शेख तयबाबेगम
(भाराकाँ): ४१८
नोटा): ९९ प्रभागनिहाय विजयी उमेदवार :
कुणी मारली बाजी ? नगरपरिषदेच्या विविध
प्रभागांत संमिश्र निकाल पाहायला मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही अनेक जागांवर यश मिळवले आहे. विश्लेषण राजकीय या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग १ मध्ये ब,५ अ आणि ७ अ अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांच्याउमेदवारांना धक्का देत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी सुजाता यंड्रलवार यांची निवड झाल्याने आता शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
◼️" जनता जनार्दनाचा विश्वास सार्थ ठरणार "
"आमच्यावर विश्वास ठेवून माझ्या मातोश्री सौ. सुजाता विनोद एंन्ड्रलवार यांना किनवटच्या जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी निवडून देत नगराध्यक्षपदी विराजमान केले आहे. किनवट शहरवासीयांचे हे ऋण मी शहराचा कायापालट करून आणि उत्तम मूलभूत सुविधा देऊन फेडणार आहे. जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.
जनतेची सेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे."
करण एन्ड्रलवार
(युवा नेतृत्व, किनवट)
◼️(किनवट पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन)
निवडणूक निकाला
नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गणेश कन्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य चौकाचौकांत पोलीस फौजफाटा तैनात होता. अत्यंत संवेदनशील वातावरणातही मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली, ज्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले.
◼️(प्रभाग :विजयी उमेदवार। पक्ष / गट)
।। १ अ । संतोष किशनराव मरस्कोल्हे। भाजपा
॥ १ ब । प्रिती धीरज नेम्माणीवार। अपक्ष
॥ २ अ। अश्विनी आदर्श जागरलावार NCP (SP)
॥ २ ब । मोहम्मद हसन पठाण (NCP) 1
। ३ अ। निलोफर निसार भाटी। शिवसेना (उबाठा)
॥ ३ ब। श्रीराम नारायणराव नेम्माणीवार । शिवसेना (उबाठा)
॥ ४ अ। अभय मधुकर नगराळे । NCP
॥ ४ ब। नुरसबा मुकद्दर शेख । NCP
।। ५ अ। चंद्रशेखर रंगराव नेम्माणीवार। अपक्ष
।। ५ ब । निकीता स्वागत आयनेनिवार । भाजपा
।। ६अ। प्रविण इंद्रसिंग राठोड । NCP (SP)
।। ६ ब। सरोजिनी बाबूराव ओडीवार। भाजपा
।। ७ अ । ललिताबाई मारोती मुनेश्वर । अपक्ष
।। ७ ब । श्रीनिवास किशनराव नेम्माणीवार । भाजपा
।। ८ अ । गंगाबाई नारायणराव कोल्हे। शिवसेना (उबाठा)
।। ८ ब । सुरज किशनराव सातुरवार । शिवसेना
।। ९. अ । सादिका इम्रान शेख ।
॥ ९ ब । नईमाबेगम मिर्झा सईद । NCP (SP)
।। १० अ । अभय भिमराव महाजन NCP (SP)
।। १० ब । गुलबखत अकबर खान । NCP
॥ १० क। जरीना खानम साजिद खान। NCP ।





Comments
Post a Comment