किनवट,दि.२४ : साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी विश्वस्त रुग्णालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त किनवट शहरात देश व राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व थोर मान्यवरांची प्रभावी उपस्थिती लाभली. या लोकार्पण सोहळ्यामुळे किनवटचा सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील मान अधिक उंचावला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.
या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, पद्मश्री नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉ. योगेंद्र वरडकर, डॉ. शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, एमआयडीसीचे कोठारे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सुहाना मसालेचे गिरीश क्षीरसागर तसेच व्यंकटेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आदरातिथ्य किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी नगराध्यक्षा या नात्याने केले, तर युवा नेते करण येंड्रलवार यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
या रुग्णालयाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना अद्ययावत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने, हा सोहळा केवळ उद्घाटनापुरता न राहता किनवटच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले

Comments
Post a Comment