किनवट ता. प्रतिनिधी:
किनवट शहरातील डॉ. बाबा साहेब आंबेडकर पुतळा परिसर, महात्मा फुले चौक पुतळा परिसर, अशोक स्तंभ, सविधांन स्तंभ परिसर अशा परिसरामध्ये शिलवंत येरेकार यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून त्यांनी पुतळ्याची व स्मारकाची पाण्याने स्वच्छ धुवून साफ सफाई केली त्यांचे सामाजिक कार्य सर्वांना परिचित आहे.
त्यांनी कवीता लेखन, ललीत लेखन, पर्यटन प्रवास वर्णन तथा अन्य सामाजिक कार्यात त्यांना रस आहे त्यांनी अनेक वर्षा पासुन स्वच्छता व लेखन हे काम करत आले आहेत म्हणून त्यांनी यदाही आपले सहकारी सुनिल पाटील यांच्या सोबत संविधान दिना निमित्त परिसरातील घान साफ करून पुतळे धुतले व स्वच्छ केले त्यांच्या या कार्याची किनवट परिसरात चर्चा सुरू असून त्यांचे कौतुक होत आहे तसेच भारतिय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके व सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी त्यांच्या या कामा बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment