Skip to main content

संविधान निर्मात्यांनी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली -प्राचार्य डॉ. सुभाष गवई

 


किनवट : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली आहे. ह्यानुसार सर्व समान आहेत. सर्वांना समतेचा अधिकार आहे. सर्वांना एकसारखा कायदा लागू आहे. संविधानाने भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले पण यामुळे स्वैराचाराला मुभा नाही. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले परंतु इतर धर्माचा आदर करायला सांगितले. या देशाला राष्ट्र करायचे आहे तर ह्या देशाला धर्मनिरपेक्ष , जातीविरहीत केलं पाहिजे. असे प्रतिपादन विदर्भ महारोगी सेवामंडळ , तपोवन अमरावतीचे अध्यक्ष कुष्ठ सेवाकर्मी , संविधानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले.

         ते येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा " या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीस 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत प्रत्येक शाळेत गावात राबवून संविधानाबद्दल जनजागृती, प्रभात फेरी, विविध स्पर्धा तसेच व्याख्यान यांचे आयोजन करावे. ह्या शासननिर्णयानुसार हे व्याख्यान आयोजित केले होते.

     याप्रसंगी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, ऍड. विक्रांत गवई, संस्थेच्या कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके व डॉ. मोना गवई  या मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

     पुढे बोलतांना डॉ. गवई म्हणाले की, मानवी हक्काची सनद संयुक्त राष्ट्र संघाने 1948 मध्ये स्विकारली. पण 1949 राजकीय लोकशाही मिळाली. डॉ. बाबासाहेबांनी 1946 पासुनच तथागत बुद्धांच्या विचारातून ही लोकशाही आणली. ती इतर देशातून घेतली नाही. संविधानात लिंगभेदाला थारा नाही. परंतु आजही मुलीं-मुलांमध्ये फरक केल्या जातो. मुलींना , महिलांना शिक्षणाची मुभा दिली परंतु त्यांना स्वतंत्र विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. भगवान बुद्ध , महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार दिला होता. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाज व्यवस्थेला बदलण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. म्हणून सर्वांनी प्रगल्भ व्हावे.

     शुभांगी बेद्रे या विद्यार्थिनीचे प्रास्ताविक भाषण झाले. पाहुण्यांचा परिचर वैशाली साबळे-नरवाडे यांनी करून दिला. पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. उप प्राचार्य राधेश्याम जाधव यांनी आभार मानले.

        प्रारंभी फर्स्ट ऑफिसर डी.एस.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. 52 महाराष्ट्र बटालियनच्या पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उप मुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक  रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकूंद मुनेश्वर यांचेसह सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संविधान उद्देशिका सामुहीक वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...