किनवट प्रतिनिधी:
अवघ्या महाराष्ट्रात साहित्य चळवळ राबवत असलेली व नवोदीत साहित्यिक कवी लेखकाच्या कार्याची दखल घेणारी संस्था म्हणजे अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य याच संस्थेने आदिवासी दुर्गम भागातील कला साहित्य वाचन, पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या राजेश पाटील या युवकास अक्षरोदय साहित्य मंडळच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिली असून समिती मंडळाच्या वतीने निवडपत्र पाठवले आहे.
सदरील पत्रावर राज्याध्यक्ष सौ.सिंधुताई दहिफळे, कार्याध्यक्ष सदानंदजी सपकाळे, सचिव नरेंद्र धोंगडे , सहसचिव चंद्रकांत चव्हाण, कोषाध्यक्ष उषाताई ठाकुर, बालीका बरगळ, माया तळणकर, पंकज कांबळे, अविष्कार शिंदे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत या नियुक्तीमुळे किनवट तालुक्यातील साहित्य क्षेत्रात नव चैतन्य निर्माण झाले असुन राजेश पाटील यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साहित्य वाचन संस्कृती क्षेत्रात राजेश पाटिल यांनी जे योगदान दिले त्या बद्दल त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी तेलंगणासहीत विविध जिल्ह्यांतील ,साहित्य संमेलन, व्यसनमुक्तीसाठी कार्य, पर्यावरण जागृती, कार्यशाळा,स्वारतिमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात कवी मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले आहेत, तसेच जागतिक धम्म परिषदेत कवी म्हणून त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे , तसेच किनवट तालुक्यातील , शाळा, महाविद्यालयात कवी लेखक म्हणून अनेकदा प्रमुख उपस्थिती लावली आहे
त्यांचे अनेक कविता , लेख विविध पुस्तकात, प्रातिनिधिक संग्रहात , वर्तमान पत्रात प्रकाशित झालेले आहेत तसेच दैनिक लोकशक्तीचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत .
निवडी बद्दल परिवार, ॲड. मिलींद सर्पे, शकील बडगुजर, गोकुळ भवरे, आनंद भालेराव,साजीद बडगुजर शिलरत्न पाटील, संतोष सिसले, सय्यद नदीम, नसीर तगाले, शेख अतिफ, राज माहुरकर,ॲड. सचिन दारवंडे , क्रांतिसुर्यचे रमेश मुनेश्वर, उपप्राचार्य पंजाब शेरे, उत्तम कानिंदे, प्रा. गजानन सोनोने, कवी महेंद्र नरवाडे, मारोती देवकते, प्रविण वावळे, संजय नरवाडे, अविनाश ठमके,प्रफुल आढागळे, सतिश कऱ्हाळे, अरुण घुले, संतोष पहुरकर सम्यक सर्पे, दिपक जाधव , किशन गेडाम, शिवा सिडाम, गजाजन बावणे, प्रितम सिरमनवार , पत्रकार , वकील मित्र सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment