Skip to main content

रमेश मुनेश्वर व रुपेश मुनेश्वर या शिक्षक बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 


किनवट प्रतिनिधी:

 लातूर येथे संपन्न झालेल्या शिक्षक , कर्मचारी व अधिकारी विभागीय स्पर्धेत रमेश मुनेश्वर यांनी एकपात्री अभिनय व रूपेश मुनेश्वर यांनी स्वरचित काव्य सादरकीरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातील या दोन शिक्षक  बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने दयानंद महविद्यालय , लातूर येथे शिक्षक , कर्मचारी व  अधिकारी यांच्या विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना यात सहभागाची संधी होती. यावेळी भूमिका अभिनय या क्षेत्रातील व्यसनाधीनतेवर मात या विषयावर तालुक्यातील शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी ( चि ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी 'मी हरलो होतो पण जिंकलो '  ही  एकपात्री नाटिका सादरकरून आणि स्वलिखित काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रुपेश माधवराव मुनेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारी ' शेतकरी बाप ' ही कविता बहारदार सादर करून विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. 

    



या शिक्षक बंधूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल डायटचे प्राचार्य अमोल निळेकर जिल्हा परिषद, नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (यो) दिलीपकुमार बनसोडे, किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जम्पलवाड, मनिषा बडगीरे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, राम बुसमवार, पद्माकर कवटीकवार, रमेश राठोड, रमेश खूपसे, विजय मडावी, राजेश्वर जोशी, चंद्रकांत मोरे, सुरेश पाटील, शेषराव पाटील, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे आदी मान्यवरांसह बहुसंख्य शिक्षक बंधू-भगिनिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...