Skip to main content

शासकीय आश्रम शाळेच्या गजानन खुपसेने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पटकाविले कास्यपदक

 


तालुका बातमीदार किनवट : येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील एका आदिवासी विद्यार्थ्याने बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे स्पर्धेत कांस्य पदक पटकाविल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदेड जिल्हयातील किनवट या डोंगरी तालुक्यातील बोधडी (बु) या गावातील मूळनिवासी तथा शासकीय आदिवासी आश्रम शाळा किनवट येथील इयत्ता ६ वीमध्ये शिकणारा आदिवासी विद्यार्थी गजानन मारुती खूपसे याने १४ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या २० किलोग्रॅम वजनगट राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.


आदिवासी पारंपरिक खेळा व्यतिरिक्त या विद्यार्थ्याने इतर खेळामध्ये कौशल्य प्राप्त करून यश संपादन केले आहे. यामुळे आता हा विद्यार्थी महाराष्ट्र शासनच्या नौकरी मध्ये ५% आरक्षणाचा भागिदार बनला आहे.


बारामती येथे पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे जगन्नाथ लकडे, एशियन पदक विजेते व कराटे असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव संदीप गाडे यांनी या विद्यार्थ्यास घडविणारे क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप येशीमोड यांचे उपस्थितीत ह्या विद्यार्थ्यास प्राविण्य प्रमाणपत्र व कास्य पदक प्रदान केले.


या भरीव यशाबद्दल प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) राजेंद्र शेळके, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मुंडे, सह शिक्षक गणेश येरकाडे, माधव देशमुखे, श्री मडावी, श्री घुले आदीसह सर्व शिक्षकांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...